स्थानिक गुन्हे शाखा, व शिक्रापूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज  कारवाई ! कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या तीघांना अटक 


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा, व शिक्रापूर पोलीस स्टेशन
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिक्रापूर पो.स्टे. गु.र.नं. ३६६/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दि.०४/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी नामे सोपान राधाकिसन आंधळे वय ३३ वर्षे, रा. शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर हे त्यांचे कुटुंबासह पुणे बाजूकडून अहिल्यानगर कडे दि. ०४/०६/२०२५ रोजी जात असताना पहाटे ०४/०० वा सु ास कोंढापूरी ता. शिरूर जि पुणे येथील सुरज पेट्रोल पंपाजवळ त्यांचे ताब्यातील निसान टेरेनो कार नं. एम.एच. ०१ बी.यु. ०३६६ ही रोडचे कडेला पार्क करून कारमध्ये झोपले होते. त्यादरम्यान मोटार सायकलवर आलेले तीन अज्ञात चोरटयांनी कोयत्याचा धाक दाखवत दमदाटी करून चोरटयांनी फिर्यादी कडील ५०० रू. व त्यांचे पत्नी कडील दिड तोळयाचे गंठन असा एकूण ९०,५००/- रू. या मुद्देमाल जबरीने चोरून नेला आहे. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर कोयत्यात्चा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचे गुन्हे दाखल झाले होते, त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी सदरचे मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेतली आणि योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. जबरी चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळांची पाहणी करून गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांचेशी संवाद साधला असता, सर्व घटनांमध्ये कोयत्याचा धाक दाखविणेत आला असून चोरटयांनी मोटार सायकलचा वापर केला आहे व चोरटे गुन्हा केले नंतर अहिल्यानगर बाजूकडेच गेल्याचे निष्पन्न झाले. स्था.गु.शा. व शिक्रापूर पो स्टे कडोल तपास पथकाने एकत्रित गुन्हयाचा तपास करत असताना सुमारे १२५ किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले, संशयित मोटार सायकल ही अहिल्यानगर ते राहूरी रोडकडे गेल्याची माहिती मिळाली. त्या परिसरातील गोपनीय बातमीदार यांना गुन्हयांची माहिती व आरोपींची माहिती सांगितली असता, वेळद गावातील रेकॉर्डवरील आरोपी १) आकाश पांडुरंग शिंदे २) महेश मानाजी शिवे, ३) राहूल रामदास पवार तिघे राहणार वेळद ता. नगर, जि. अहिल्यानगर यांनी केला असलेबाबत माहिती मिळाली.
गोपनीय बातमीचे आधारे तपास पथकाने आरोपीबायत माहिती घेतली व खात्री करून आरोपी १) आकाश पांडुरंग शिंदे बय ३० वर्षे, २) महेश मानाजी शिंदे, बय ३१ वर्षे, ३) राहूल रामदास पवार, वय ३० वर्षे, तिथे राहणार वेळद ता. नगर, जि. अहिल्यानगर यांना गुन्हयाचे तपासकामी वेळद घाट परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
मोटार सायकल असा एकूण सुमारे आरोपींकडून गुन्हयात वापरलेले ०२ कोयते, ७.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ५,६२,०००/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. आरोपीना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित करणेत आले होते, दि. ०३/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आली होती. सध्या तीनही आरोपी हे न्यायालयीन कोठडी रिमांड मध्ये आहेत
सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार आणि रेकॉर्डवरील असून त्यांचेवर मालमत्ता चोरीचे दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी आकाश शिंदे वाचेवर ८ गुन्हे, आरोपी महेश शिंदे याचेवर ६ गुन्हे, आरोपी राहुल पवार वाचेवर ०२ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पो स्टे चे पो.नि. दिपरत्न गायकवाड, शिरूर पी स्टे चे पो नि संदेश कंजळे, रांजणगाव पो स्टे चे पो नि महादेव वाघमोडे, स्वा.गु.शा.चे शिक्रापूर पो स्टे चे पोसई महेश डोंगरे, पोसई विजय मस्कर, स्था.गु.शा. चे अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमोण, संजू जाधव, सागर धुमाळ, शिक्रापूर पो स्टेचे अंमलदार जयराज देवकर, अमोल नलगे, अमोल दांडगे, रोहीत पारखे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!