पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने राबविलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेत एकुण ७२ कारवायांमध्ये १३५ किलो गांजासह एकुण ७८ लाखाचा मुद्देमाल जप्त
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि ०१/०५/२०२५ ते दि ३१/०५/२०२५ या कालावधीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करणेकरीता विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशीत केले होते.
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणेबाबत पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी यांना सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये २८ विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. त्यांनी दि ०१/०५/२०२५ ते दि ३१/०५/२०२५ या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील वेगवेगळया पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकुण ७२ कारवाई केल्या असुन त्यामध्ये १३५ किलो ३९६ ग्रम गांजा, ५२१.२ ग्रम अफिम, ९५.८१ ग्रम एम.डी. असा मिळुन ७८,०२,०२५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन एकुण ८३ आरोपींवर कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेने ३२ कारवाई केल्या असुन त्यामध्ये १११ किलो गांजा, ५२१ ग्रम अफिम, १५ ग्रम एम.डी. सह सुमारे ५८ लाख रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. त्यातील विशेष कारवाया पुढीलप्रमाणे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक या पथकाने केलेल्या विशेष कारवाया:-
१. बावधन पोलीस स्टेशन गु.र.क्र. २१२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (क), २९ या गुन्हयामध्ये १. अभिषेक विकास रानवडे, वय ३२ वर्षे, रा बालाजी निवास, हनुमान मंदिराचे बाजुला, पाषाण सुस रोड, पुणे मुळ रा ६२०/२१ अष्टभुजा दुर्गादेवी मंदिराचे जवळ, दुधाळवाडा, शनिवार पेठ, पुणे ३० व २. उमेश सुर्यकांत देशपांडे, वय ५६ वर्षे, रा शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, फ्लॅट क्र ७, पाषाण सुस रोड, पुणे ३. महिला नामे ऐश्वर्या अभिषेक रानवडे/ऐश्वर्या निलेश देशपांडे, वय २२ वर्षे, रा सदर, पाहिजे आरोपी नामे जयश्री उर्फ कल्याणी उमेश देशपांडे, रा बालाजी निवास, पाषाण सुस रोड, पुणे यांचेवर कारवाई करण्यात आली असुन त्यात २१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
२. चाकण पोलीस स्टेशन गु.र.क्र. २८०/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब), २९ या गुन्हयामध्ये सलमान हसन सय्यद, वय २९ वर्षे, रा शिवाजी महाराज चौक, सेंट्रल बँकेचे मागे, मंचर ता आंबेगाव जि पुणे व सनी विजय शहा, वय २१ वर्षे रा मावळे आळी, मौजे नारायणगाव, ता जुन्नर जि पुणे यांचेकडुन ११ किलो गांजा जप्त केला आहे.
३. दिघी पोलीस स्टेशन गु.र.क्र. १८६/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ या गुन्हयामध्ये १. किशोर मुरलीधर चक्कर वय३०वर्षे रा साठेवस्ती लेन क्र ४ पटेल बिल्डींग लोहगाव पुणे २. संतोष प्रकाश दाभाडे वय ३७ वर्षे रा. मोरेवस्ती चिखली पुणे यांचेकडुन १३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
४. चाकण पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३१०/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) २९ या गुन्हयामध्ये कमार बबन
मोहीते वय ३४ वर्षे रा सातकरस्थळ राजगुरुनगर ता. खेड जि पुणे याचेकडुन १५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
५. पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. २०४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) या गुन्हयामध्ये सनि धर्मासिंग माचरेकर वय १९ वर्षे रा बिल्डींग नं ५ भाटनगर पिपंरी पुणे याचेकडुन ०५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा, युनिट ३ पिंपरी चिंचवड या पथकाने केलेली विशेष कारवाई:-
१. म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३०६/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (ब). ८ (क) २० (ब) (ii) (अ),२० (क) या गुन्हयामध्ये बाळु बबन गावळ वय ६५ रा कोरेखुर्द ता खेड जि पुणे याचेकडुन २८ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
मालमत्ता विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड या पथकाने केलेली विशेष कारवाई:-
१. दिघी पोलीस स्टेशन गु.र.क्र. २०८/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) या गुन्हयामध्ये समिर सलीम खान वय २५ वर्षे रा बाळु वाळके यांचे रुममध्ये विठ्ठल रुक्मीनी मंदीराजवळ दिधी गावठाण पुणे याचे ताब्यातुन ११ ग्रम एम.डी. जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशनकडुन करण्यात आलेल्या विशेष कारवाया :-
१. म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांनी गु.र.क्र. ३१२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii), (अ) २९ या गुन्हयामध्ये बारकु म्हातारबा कानडे वय ३७ वर्षे रा कोल्हे मळा नारायणगाव ता जुन्नर जि पुणे मुळगाव कन्हेर
पोखरी ता पारनेर जि अहमदनगर याचेकडुन ५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन यांनी गु.र.क्र. २७१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) २९ या गुन्हयामध्ये १) अक्षय पप्पु २.
देडे वय २८ वर्षे रा सर्वे नं ११० कॉटर व्हील शारदाबाई वामन शाळेच्या बाजुला रामटेकडी हडपसर पुणे २) राहुल सनी देवरे वय २२ वर्षे रा सर्वे नं. ११०, कॉटर शारदाबाई वामन शाळेच्या बाजुला रामटेकडी हडपसर पुणे यांचेकडुन ६८ ग्रम एम.डी. जप्त करण्यात आला आहे.
मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, मा विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, मा शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली सदर अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविण्यात आलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव