तीन वर्षांपासुन वेगवेगळया गुन्हयांत व वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला पाहिजे असलेले अट्टल सोनसाखळी चोर खराडी पोलीसांच्या जाळयात…


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

खराडी पोलीस स्टेशन पूणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजि. नं.७६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३(५) अन्वये दाखल गुन्हयातील तक्रारदार हे त्यांचे पत्नीसह फ्रुटखरेदी करणेसाठी थांबले असताना मोटार सायकल वरून आलेल्या दोन इसमापैकी मागे बसलेल्या इसमाने तक्रारदार यांचे गळ्यातील ९०,०००/-रु किंची गळयातील कडया कडयाची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावुन चोरी करून नेलेचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रार दिले वरून खराडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असुन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे माध्यमातुन यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले.

दाखल गुन्हयातील निष्पन्न आरोपींचा शोध सुरु असताना वर नमुद गुन्हयातील आरोपी हे पुणे शहर व परिसरात येणार असल्याबाबतची खात्रीशीर खबर पोहवा १९३८ अमित जाधव व पोशि ४३५२ कोद्रे व यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाल्याने याबाबत तात्काळ वपोनि सो खराडी पो.स्टे श्री संजय चव्हाण यांनी तपास पथकाचे पोउपनि राहुल कोळपे व पथक यांना सदर ठिकाणी सापळा रचनेबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत पाठविले. तेंव्हा सदर चैन स्नॅचींग करणारे आरोपी नामे १) फिदा मनुअली इराणी, वय-३५ वर्षे, रा पाटील इस्टेट, शिवाजीनगर पुणे व २) अली अब्बास फिरोज सय्यद, वय-३० वर्षे, रा अंबिवली रेल्वे स्टेशन शेजारी, इराणी वस्ती, घर नं. ०१, मंगल पवार, अंबविली, कल्याण, ठाणे यांना ते गुन्हे करणेकामी वापरत असलेल्या चोरीच्या दुचाकी गाडीसह ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अटक आरोपी यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांचेकडून पुढीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १) अलंकार पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि.नं.८५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३ (५) (२) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि.नं. २५५/२५ भा.न्या.सं. कलम ३०४.३ (५) ३) भोसरी पोलीस स्टेशन पिं.चिं. पुणे गुन्हा रजि.नं.६४८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३(२) (बजाज पल्सर गाडी) ४) खराडी पोलीस ठाणे गु.र.क्र ७६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३ (५) असे गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये १) ७०,०००/- रू. कि.ची. एक १५.४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुटलेली पातळ चैनीचा तुकडा, २) ३०,०००/- रू. कि.ची. एक ५.६०० ग्रॅम वजनाचे तुटलेल्या मणीमंगळसुत्राचा तुकडा तर ३) ७०,०००/- रू. कि.चे. एक १५.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुटलेल्या मणीमंगळसुत्राची पट्टी तुकडा असा एकुण १,७०,०००/- कि.चे सोन्याचे दागिने व ते वापरत असलेली ६०,०००/- रू. कि.ची बजाज पल्सर चोरी केलेली दुचाकी गाडी असा एकुण २,३०,०००/- रूपयांचा मुद्देमाल त्यांचेकडून हस्तगत करणेत आलेला आहे.
आरोपी नामे फिदा मनुअली इराणी हा खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.क्रं १२४/२०२३ भादवि कलम ३०७,३२४,३२३,५०४ सह मोकाका व शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.क्रं ८२/२०२३ भादवि कलम ३०७,३२४,३४१,१४३,१४४,१४७,१४८,१४९ भारतीय हत्त्यार कायदा कलम ४(२५) क्रिं लॉ. अॅ ३/७ मपोका कलम ३७(१) सह १३५ अन्वये दाखल गुन्हयातील फरार व पाहिजे असलेला आरोपी असून त्याचेवर विविध पोलीस स्टेशनला चैन स्नॅचींग, वाहन चोरी, खुनाचा प्रयत्न, फसवणुक असे विविध प्रकारचे १७ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असुन दुसरा अटक आरोपी नामे अलीअब्बास फिरोज सय्यद याचेवर देखील ठाणे पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशनला चैन स्नॅचींगचे १७ पेक्षा जास्त गुन्हे नोंद असुन यातील फिदा ईराणी हा त्याची अटक चुकवण्यासाठी गेली तीन साडेतीन वर्षांपासुन महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयांत व बाहेरील राज्यांत वास्तव्यास होता.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त सोो श्री मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त सोो श्री हिंमत जाधव परि-४ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे मॅडम येरवडा विभाग पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण, खराडी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली राहुल कोळपे पो. उपनिरी, पो. हवा. सुरेंद्र साबळे, अमित जाधव, रोहिदास लवांडे, वसीम सय्यद, सचिन रणदिवे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सचिन पाटील, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव असे सर्वांनी मिळून केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!