मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह आणि सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी दिली भेट…


पंकेश जाधव संपादक 7020794626

मुंबई मध्यवर्ती कारागृह, मुंबई-11

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन :- मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह आणि सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक 02.08.2024 रोजी सदिच्छा भेट दिली.मा. महोदय मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे सकाळी 11.35 वाजता आगमन झाले. त्यावेळी मा. कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा, मुंबई, मा. अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह, उपअधीक्षक, वरिष्ठ तुरूंगाधिकारी, अंतर्गत सुरक्षा अधिकारी व तुरूंगाधिकारी श्रेणी-1 व 2 उपस्थित उपस्थित होते. मा. महोदयांना न्यायविभाग, हॉस्पीटल विभाग, स्वयंपाकगृह विभाग, उपहारगृह विभाग व्हिडीओ कॉन्फरन्स विभाग येथे प्रत्यक्ष भेट देवून तेथील कामकामबाबत पाहणी करून माहिती घेतली तसेच आवश्यक सुचना व बदल सुचविले. तसेच मा. महोदयांनी सर्कल क्रमांक 2, 8, 3 व 12 येथे प्रत्यक्ष भेट देवून बंदयांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या व कारागृह सुरक्षा व्यवस्था बाबत माहिती घेतली.

Advertisement

 

मा. महोदयांनी न्यायविभाग येथे बंदयांचे ई-प्रिझन प्रणालीवरील अॅडमिशन व कोर्टपेशीबाबत, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बंदयांना कोर्टपेशीसाठी हजर करणे इत्यादीबाबत माहिती घेतली. तसेच जास्तीत- जास्त बंदयांना सन्मा. न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे हजर करणेबाबत कार्यवाही करणेबाबत आदेश दिले. त्यानंतर उपहारगृह येथे भेट देवून तेथील कामकाज पदध्दत तसेच बंदयाचे मनीऑर्डर, बंदयांची मागणी व खर्च याबाबत माहिती घेतली. तसेच बंदयांचा खर्च संगणकावर जतन करणेबाबत सुचना दिल्या. सर्कल क्रमांक 2 (अतिसुरक्षा विभाग) येथे भेट देवून बंदयांच्या अडी-अडचणी तेथील सुरक्षा व्यवस्था याची पाहणी केली.

 

मा. महोदयांनी सर्कल क्र. 8 येथे भेट देवून बंदयांच्या अडी-अडचणी तेथील सुरक्षा व्यवस्था याची पाहणी केली. बंदयासाठी उपलब्ध वॉशिंग मशीन, वॉटर कुलर याची पाहणी केली. तसेच बंदयांसाठी अॅलन ग्रुप स्मार्टफोन बाबत माहिती घेतली, केऑस्क मशीनची पाहणी केली. व बंदयाने केऑस्क मशीनचा वापर केलेबाबत संपूर्ण डाटा ठेवणेबाबत सुचना दिल्या. त्यानंतर सर्कल क्र.3 येथे भेट देवून पाहणी केली.

त्यानंतर मा. महोदयांनी कारागृह हॉस्पीटल येथे भेट देवून उपलब्ध अधिकारी वर्ग, बेड, नर्सिंग कर्मचारी, संस्थेमार्फत आयोजित कॅम्प, बंदयांना बाहेरील रूग्णालयात पाठविण्याची कार्यवाही, जे जे समुह रूग्णालय वार्ड क्रमांक 44 मध्ये अॅडमिट करणेची कार्यवाही इत्यादी बाबत माहिती घेतली. त्यानंतर मा. महोदयांनी स्वयंपाकगृह येथे भेट देवून पाहणी केली. त्यानंतर सर्कल क्रमांक 12 येथे
भेट देवून बंदयांच्या अडी-अडचणी व सुरक्षा व्यवस्था याची माहिती घेतली. त्यानंतर मा. महोदयांनी मुंबई मध्यवर्ती कारागृह येथील सदिच्छा भेट संपवून दुपारी 13.36 वाजता प्रस्तान केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!