राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे या पथकाची आपटी येथे अवैध गावठी दारु वाहतुक करणाऱ्या विरुध्द धडक कारवाई.
पंकेश जाधव संपादक 7020794626
राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे.
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दि.०८/०७/२०२४ रोजी मा. विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग – श्री. सागर धोमकर सो, अधीक्षक – श्री. चरणसिंग राजपुत सो, उप-अधीक्षक श्री. सुजित पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे या पथकाचे निरीक्षक श्री. देवदत्त पोटे यांचे पथकाने प्राप्त माहितीनुसार शिरुर तालुक्यातील आपटी गावातील भामा नदीच्या कडेला, पोल्ट्री फार्मजवळ, कच्च्या रत्यावर सापळा रचुन सदर ठिकाणी संशयित टाटा कंपनीच्या टेम्पो वाहन क्र. एमएच १४ एच यु ९५६० या वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये गावठी हातभट्टी दारुने भरलेले ३५ लि. क्षमतेच्या ३५ प्लॅस्टिक कॅनमध्ये १२२५ लि. गावठी हातभट्टी दारु आढळुन आली. सराईत गुन्हेगार वाहनचालक भाऊसाहेब बबन भोसले, रा. मु. कारेवाडी, पो. भोसलेवाडी, अणे, ता. जुन्नर, जि. पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन वाहनासह एकुण रु.४,७६,०००/- किंमतीचा दारुबंदी गुन्हयांतील मुद्देमाल जप्त केला असुन त्याचे विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, पुणे पथकाचे निरीक्षक श्री. देवदत्त पोटे व दुय्यम निरीक्षक श्री. बी. एस. घुगे, श्री. डी. एस. सुर्यवंशी तसेच जवान सर्वश्री सुरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर, महिला जवान सौ. शाहिन इनामदार यांनी पार पाडली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. देवदत्त पोटे हे करीत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री बाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

