भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अवैध्द स्टेरॉईड विक्री करणा-यावर कारवाई


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ३०/०६/२०२४ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे यांना बातमी मिळाली की, सातारा रोडवरील, लोखंडी पुलाचे अलीकडे एक इसम बॉडी बिल्डींगसाठी लागणारे अवैध्द इंजेक्शनची ग्राहकांना विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सातारा रोडवरील लोखंडी पुलाचे खालील बाजुस जावुन पाहता तेथे बातमी प्रमाणे इसम नामे आझाद मुमताज खान, वय ४१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर सी, प्रेम हाईटस, सनं ३३/३ बी, आंबेगाव बु, पुणे हा त्याचे ताब्यात १३ नग Mephentermine Sulphate Injection IP (TERVAMI) (बॉडी बिल्डींगसाठी लागणारे अवैध्द इंजेक्शन) व ५ सिरीज सह मिळुन आल्याने त्याचेकडुन नमुद माल जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६१/२०२४, भादंवि कलम ३३६, २७६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधतु जमदाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!