गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी ! पिस्टल सह रावण टोळीचा सदस्य आरोपी ताब्यात…


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट 2 पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी आमचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोकॉ 1920 अजित सानप व पोना 1924 नामदेव कापसे यांना त्यांचे े गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन *रावण टोळीचा सदस्य व रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनेश पुखराज रेनवा वय 28 वर्षे, रा. माने चाळ रूम नंबर 3 साई मंदिराच्यामागे मोरेवस्ती, चिखली, पुणे* यास मोरेवस्ती चिखली येथील साई मंदिरा जवळ साने चौक येथे युनिट 2 चे पोलीस उप-निरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार 443 प्रमोद वेताळ, 832 जयवंत राऊत, 658 संतोष इंगळे, पोना 1924 नामदेव कापसे, पो.अं. 1920 अजित सानप यांनी सापळा शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीत याचे कब्जात *एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राउंड असे अग्निशस्त्र मिळुन आले.* सदरबाबत सखोल माहीती घेवून आरोपीत याचेविरुध्द *भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद* करुन गुन्हयाचेकामी चिखली पोस्टेला हजर केले आहे.

Advertisement

 

आरोपीचा पुर्वइतिहास-
चिंचवड 80/2017 भादवि कलम 307, 143, 147, 148, 149, आर्म ऍ़क्ट 4 (25)
निगडी 587/2019 मपोका कलम 37 (1) (3) सह 135
चिंचवड 99/2017 भादवि कलम 307, 143, 147, 148, 149, आर्म ऍ़क्ट 4 (25)
देहूरोड 519/2018 मोक्का ऍ़क्ट 3 (1)(2), 3 (4)


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!