अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा कोंढवा भागात धडक कारवाई करुन १४,००,०००/- रु किंमतीचा मॅफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने आज दि.२७/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेले बातमीनुसार ११/३५ वा ओपेल फलक सोसायटी समोर, मलीक नगर, कोंढवा, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) जहीर ऊर्फ साद गनी खान, वय २० वर्षे, २) आदनान शाबीर शेख, वय २५ वर्षे, दोन्ही रा. कोंढवा, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण १४,००,०००/- रु.कि.चा ६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एम. डी) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार अझिम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, योगेश मांढरे, अझिम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझाद पाटील यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!