पुण्यात भारी ! गुन्हे शाखा यूनिट ५ ची कामगिरी …पोलीस कस्टडीतुन पलायन केलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस केले अवघ्या ४ तासात जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा यूनिट ५ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- आज दि. २२/०६/२०२४ रोजी सुमारे दिड वाजणेदरम्यान वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपी नामे गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे याची फिंगरप्रिन्ट काढणेकामी हडपसर पोलीसांनी त्यास लॉकअपमधुन बाहेर काढले असता पोलीसांची नजर चुकवुन तो पळुन गेला होता. नमुद आरोपीचा शोध घेणेकामी हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करणेकामी मा. वरिष्ठांनी आदेशित केले.त्याप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट-५कडील पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कृष्णा बाबर व तपास टिमने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पेट्रोलिंग दरम्यान नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गोविंद उर्फ पिंटया घोडखे हा वडकी येथील सकाळ प्रेसच्या पाठीमागे जंगलामध्ये लपुन बसलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने आम्ही सदरची बातमी युनिट प्रभारी यांना कळवुन आम्ही लागलीच सकाळ प्रेस, वडकी येथील जंगलात जाऊन आरोपीचा शोध घेतला असता पोलीस स्टाफ ओळखत असलेला आरोपी नामे गोविंद उर्फ पिंट्या घोडखे हा एका झाडा खाली लपुन बसलेला दिसला. पोलीस दबक्या पावलाने त्याचे जवळ जात असताना त्याचे व पोलीसाची नजरा नजर होताच तो उठुन पळून जाऊ लागल्याने आरोपी गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे वय २४ वर्षे रा. गल्ली नंबर ५, वरदविनायक कॉलणी, गंगानगर, हडपसर पुणे यास लागलीच १७.०० वाजता वरील स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले. त्याचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०१५/२०२४, भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यास पुढील कारवाईकामी हडपसर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिला आहे.

आरोपी नामे गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे याचेवर दाखल असलेले गुन्हे

Advertisement

१) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १२४२/२०२२, भा.दं. वि. कलम ३०७, ३२५, ५०४, ५०६
२) खडक पो.स्टे. गु.र.नं. १८१/२०२२, भा.दं. वि. कलम ३७९
३) शिवाजीनगर पो.स्टे. गु.र.नं. ५३/२०२३, भा.दं.वि. कलम ३८४, ५०७, ३४
४) पिंपळदरी पो.स्टे. गु.र.नं. २००/२०१७, भा.दं.वि कलम २८३
५) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १००४/२०२४ भा.द.वि. कलम ३७९
) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १०१२ /२०२४ भा.द.वि. कलम ३७९ ६

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे,सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अमित कांबळे, अकबर शेख, यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!