मोक्का गुन्हयातील आंदेकर टोळीच्या पाहीजे आरोपीस केले अटक


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज !  ऑनलाईन पुणे :- दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर याची हत्या झाली असून त्याच्या खुनाचा बदला घेणेसाठी नमुद आरोपीतांचे नातेवाईकांना जीवे ठार मारण्यासाठी अपप्रेरणा देवून फौजदारी कट रचून दता बाळू काळे यास आंबेगाव पठार भागात रेकी करणेसाठी पाठवून तेथे रुम भाडयाने घेवून सदर गुन्हा केला आहे. सदर बाबात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९९/२०२५ भा.न्या.सं.क ५५. ६६(२), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कलम १ (ii), ३ (२), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे दत्ता बाळु काळे, वय २४ वर्षे रा. डोके तालीमच्या मागे गणेश पेठ, पुणे. याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार यांना सदरचा आरोपी हा स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण पुलाचे खालील बाजुस थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली असता तात्काळ नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी स्वारगेट लक्ष्मीनारायण पुलाचे खालील बाजुस जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने, त्यास गुन्हयाचे तपासी अधिकारी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांनी दिनांक १५/१०/२०२५ रोजी अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे व सचिन सरपाले यांनी केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!