अवैधरित्या घातक शस्त्र बाळगल्या बाबद प्रसाद तापकीर याचा जामीन मंजूर
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोयता सारखे धारधार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या, प्रसाद तापकीर याला पोलिसांनी ताब्यात घेतले . म्हात्रे पुलाजवळ पोलीस पेट्रोलिंग करीत असताना , एक इसम हातात संशयास्पद वस्तू घेऊन थांबला होता, पोलिसांनी सदर इसमाकडे जवळ येऊन पाहीले असता , तो इसम हातातील वस्तू लपवत होता , पोलिसांना संशय आला , पोलीस अंगझडती घेत असता , सदर इसमाकडे धारधार शस्त्र आढळून आले , सदर इसम निघून जायच्या तयारीत असता पोलिसांनी सदर इसमास दोन पंचासमक्ष कायदेशीर ताब्यात घेऊन सदर इस्माविरुद्ध शस्त्र संपती आधिनियम १९६८ प्रमाणे ४(२५) , महाराष्ट्र पोलीस आधिनियम कायदा ३७(१) ,१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(३)अन्वये दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
मात्र आरोपीने ॲड. शुभम लोखंडे यांचे कडे धाव घेतली असता, आरोपीच्या वतीने ॲड. शुभम लोखंडे यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालय कोर्टासमोर कामकाज पाहिले . यांच्या बाजूचे युक्तीवाद ग्राह्य धरून सदर आरोपीचा जामिन मंजूर करण्यात आला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

