देशी बनावटीचे ०४ कटटे व ०७ जिवंत काडतुसे बाळगणा-यांना खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये अग्निशस्त्रे जवळ बाळगणारे, शस्त्र पुरविणारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणेबाबतचे निर्देश मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार यांचेकडून गुन्हे शाखेकडील अधिकारी यांना प्राप्त झालेले होते. पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे
देखरेखी खाली पथक माहिती काढीत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अग्निशस्त्र बाळगणा-या १) संकेत शिवाजी गांडले वय २१ वर्षे, रा. नांदेड फाटा, पुणे २) मंगेश राजु भोसले वय २१ वर्षे, रा. कोल्हेवाड़ी सिंहगडरोड फाटा, पुणे यांना मधुकोष सोसायटीसमोरुन प्रायेजा सिटी ककडे जाणा-या कॅनल रोडला वडगाव खुर्द पुणे परिसरामध्ये सापळा रचून त्यांना पकडून त्याचे ताब्यातून देशी बनावटीचे एकूण ०४ पिस्टल व ०७ जिवंत काडतूसे असा किं.रु.१,०३,५४०/- चा माल जप्त करून त्याचेविरुध्द सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ३९७/२०२४ भारतीय शत्र अधिनियम कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, व पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, आजिनाथ येडे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सैदोबा भोजराव, गणेश खरात, चेतन आपटे, राहुल उत्तरकर, चेतन शिरोळकर, चेतन चव्हाण यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

