भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील गंभीर गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
युनिट ०३, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनाक २३/११/२०२५ रोजी अभिलेखावरील तडीपार, मोक्का पाहिजे आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशित केल्याने युनिट ०३ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट ०३ चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंमलदार हद्दीत असे पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना त्यांच्या बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, भारती विदयापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. ४५४/२०२५, ११८ (२),१२५ (अ), ३५२.३५१(२),३२४(४), ३ (५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३), १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे रामदास बबन कचरे हा वारजे ब्रिज येथे आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता, बातमीतील मिळालेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम वारजे पुलाजवळ, उत्तम चहाच्या दुकानाजवळ येथे थांबला असताना मिळुन आला. त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रामदास बबन कचरे, वय २३ वर्ष, रा. मुक्काम वेगरे पोस्ट कोळावडे, ता. मुळशी, जि. पुणे. असे असल्याचे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट ०३ कार्यालय येथे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कार्यवाही कामी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरील पाहीजे आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन हिजंवडी, पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण अभिलेखावर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी हि मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहरश्री. पंकज देशमुख मा. पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १. पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे मा. प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राऊत यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उप-निरीक्षक पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अमंलदार अमोल काटकर, मारुती पारधी, कैलास निम्हण व तुषार किंद्रे यांचे पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!