स्थानिक गुन्हे शाखेकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस सह दोन आरोपी जेरबंद


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- आज दी २९/०४/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक संदर्भाने पेट्रोलिंग करीत असताना मौजे सहजपूर फाटा ता दौंड येथे एक इसम आपले कब्ज्यात गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली . सदर बातमीच्या अनुषंगाने मौजे सहजपूर येथे जाऊन सापळा रचून इसम नामे अथर्व संदीप जाधव वय १८ वर्षे रा गोंधळे नगर हडपसर ता हवेली जि पुणे या इसमास पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कमरेला मागील बाजूस पँट च्या आत एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले, त्यास त्याबाबत विचारले असता त्याने सदरचे पिस्टल हे त्याचा मित्र नामे विजय बाळकृष्ण नेटके वय रा देलवडी ता दौंड जि पुणे याचे पिस्टल असल्याचे सांगितले त्यावरुन इसम नामे विजय बाळकृष्ण नेटके वय रा देलवडी ता दौंड जि पुणे यास देखील ताब्यात घेतले असून त्यांचे कडून एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल की रू ३५००० आणि एक जिवंत काडतुस की रू १०० असा एकूण ३५,१०० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरील आरोपी विरुद्ध भा ह कायदा कलम ३ (२५) महा पोलीस का कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी यवत पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख सो अप्पर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर सो पो उप निरीक्षक प्रदीप चौधरी सो पो हवा विजय कांचन पो हवा अतुल डेरे पो ना अमोल शेडगे पो शि धिरज जाधव यांनी केली आहे.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!