भोसरी परीसरात सव्वा दोन किलो गांजासह; दोघे जण पिंपरी चिंचवड अमली विरोधी पथकाच्या जाळ्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- अंमली विरोधी पथकाला मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे भोसरी पोलीस ठाण्याच्‍या हद्दीतील गणेशनगर येथील गणेश गार्डन सोसायटीत रस्‍याच्‍या कडेला कारवाई करत आरोपींना ताब्‍यात घेतले आहे.

Advertisement

पिंपरी-चिंचवड पाेलिसांच्‍या अंमली विरोधी पथकाने सुमारे सव्वा दोन किलो गांजासह दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अंमली विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय दिपक दौंडकर, यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नूर महिताब अली शेख, (वय २८, रा. महात्‍मा फुलेनगर, दापोडी), गणेश विनायक काटे, (वय ३२, रा. गणेशनगर, दापोडी) अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

त्‍यांच्‍याकडून दोन किलो दोनशे ग्रॅम गांजा, रोख रक्‍कम असा एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!