भोसरी परीसरात सव्वा दोन किलो गांजासह; दोघे जण पिंपरी चिंचवड अमली विरोधी पथकाच्या जाळ्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोध पथक पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- आज दि 28/04/2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक कडील सपोनि सचिन कदम, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोहवा/665 दिनकर भुजबळ, पोहवा/826 संतोष दिघे, पोना/1779 प्रसाद कलाटे, पोना/1916 विजय दौंडकर, पोशि/1486 प्रसाद जंगीलवाड व पोशि/2712 कपिलेश इगवे असे भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या बातमीवरुन इसम नामे *1. नुर महिताब अली शेख, वय 28 वर्षे, रा महात्मा फुले नगर, आंबेडकर पुतळयाचे मागे, दापोडी पुणे व 2. गणेश विनायक काटे, वय 32 वर्षे, रा गणेश गार्डन सोसायटी, अे 6, गणेश नगर, दापोडी, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन *एकुण 1,12,370/- रु. किं. चा 2232 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम* असा माल जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द भोसरी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अक्ट कलम 8(क), 20(ब)(ii)(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे साो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, संदीप डोईफोडे साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. बाळासाहेव कोपनर, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे, सहा. पोलीस निरीक्षक सचिन कदम,सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड,पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, संतोष दिघे, मयुर वाडकर, दिनकर भुजबळ, प्रसाद जंगीलवड,पोलीस नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, ,कपिलेश इगवे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

