बेकायदेशीर कोयता बाळगणारा रेकॉर्डवरील तडिपार सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलीसांच्या जाळयात
आकाश पांचाळ सह संपादक 7020794626
बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहार
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि.०६/०९/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, व तपास पथकातील अमंलदार असे पोलीस स्टेशन हद्यीत वरिष्ठांचे आदेशाने रात्रगस्त करीत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले व सुमित तापकीर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकार्डवरील तडिपार गुन्हेगार कुंदन शिंदे हा डॉ बाबासाहेब आंबेडकर उदयान, २७६ ओटा, अप्पर बिबवेवाडी, पुणे येथे मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन स्वतःचे हातातील लोखंडी कोयता लोकांना दाखवून ” माझे नादी लागू नका नाहीतर, एकएकाला खपवून टाकीन” असे म्हणून व त्याचे हातातील कोयता लोकांवर उगारत होता. लोकांनी त्याला पाहून घाबरून घरात जावून दरवाजे लावून घेतले. अशी माहिती प्राप्त झालेने सदर माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मंगल मोढवे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांना सांगितली असता त्यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून तडिपार इसम नामे कुंदन ऊर्फ यश अनिल शिंदे, वय २१ वर्षे रा. चाळ नं.ए/१५, खोली नं.०६, अप्पर ओटा बिबवेवाडी पुणे यास त्याचे हातातील लोखंडी कोयत्यासह २३.३५ वा. चे सुमारास ताब्यात घेवून त्यांचेकडील लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याने तडिपार कालावधी मध्ये पुणे शहरात येण्यासाठी कोणत्याही सक्षम अधिकारी यांचे परवानगी घेतलेली नाही. सदर इसमाविरूध्द पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने तो बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.२१३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) सह १३५,१४२ तसेच फौजदारी सुधारणा अधि. १९३२ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, अभिषेक धुमाळ, प्रणय पाटील, जोतिष काळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव