चार तासात लोणीकंद पोलिसांनी मुलीचा शोध लावल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आले


पत्रकार विक्रम मोरे पुणे जिल्हा 

लोणिकंद पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि 21/09/24 रोजी रात्रौ 19.45 वाजण्याचे सुमारास केसनंद भागातून मुलगी नामे शर्वरी वैजनाथ कदम, वय 12 वर्षे राहणार केसनंद ही तिचे राहते घरातून निघून गेली आहे बाबत पोलीस स्टेशनला 22.40 वाजता माहिती मिळाल्याने सदरबाब मा.वरिष्ठांना कळविली असता लागलीच लोणीकंद पोलीस स्टेशनचे तीन पथके तयार करून त्यांना विविध मार्गाने रवाना करून शोधकार्य सुरू केले. तपास पथकासह आम्ही स्वतः सदर मुलीचा केसनंद भागात कॅमेऱ्याद्वारे शोध घेऊन शेवटचा कॅमेरा पाहून शिवालय मंदिर केसनंद येथे चौकशी केली असता सदरची मुलगी शिवालय मंदिर केसनंद येथे मिळून आलेली आहे. मुलीला अभ्यास करण्याच्या कारणावरून तिच्या आईने रागावल्याने ती रागाच्या भरामध्ये घरातून निघून गेलेली होती बाबत सांगितलेली आहे. मुलगी सुखरूप आहे. तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अवघ्या चार तासात लोणीकंद पोलिसांनी मुलीचा शोध लावल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आले.
सदरची कामगिरी श्री हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पंडीत रेजितवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन, रवींद्र गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तुकाराम सुरवसे पोलीस उपनिरीक्षक, संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक , पो ना जाधव, पो ना फरांदे, पो शी गोपाळे, पो शी सपुरे, पो शी रोकडे, पो शी शिवले, पो शी गायकवाड, पो शी आसावले, पो शी सालके, पो शी ढवळे, पो शी विखे, पो शी मांदळे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!