०१ वर्षापासुन फरार असलेला प्रस्तावित स्थानबद्ध आरोपीस युनिट-०४ ने केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

गुन्हे शाखा, युनिट-४, पुणे शहर.

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१६/०४/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट-०४ चे पथक खराडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चतुःश्रृंगी पोलीस ठाणेकडील प्रस्तावित स्थानबद्ध मधील आरोपी नामे मयुर मोरे हा आता बकोरी रोड वाघोली पुणे या भागात फिरत असुन त्याने अंगामध्ये ग्रे रंगाचा लायनिंगचा टि शर्ट व ग्रे रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने सदर पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांना माहीती दिली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन कारवाई करणेचे आदेश दिले.

गुन्हे शाखा, युनिट -०४ चे पथकाने बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाचे इसम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वाघोली पुणे येथे मिळुन आल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मयुर राजु मोरे वय २६ वर्षे, रा. बकोरी फाटा, राधेश्वरी कॉलनी, गार्डेनिया सोसायटी, फ्लॅट नं. ३०४, वाघोली, पुणे असे असल्याचे सांगितले. सदरबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाणेस संपर्क करुन माहीती घेतली असता सदर आरोपी हा आदेश क्र. पीसीबी/स्थानबद्ध/३६०/२०२४ दि. १५/०४/२०२४ अन्वये चतुःश्रृंगी पोलीस ठाणेकडील प्रस्तावित स्थानबद्ध मधील असलेबाबत माहीती मिळाल्याने त्यास पुढील कायदेशीर कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस ठाणे पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, युनिट-४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार प्रविण राजपुत, यास्मिन सय्यद, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, वैभव रणपिसे, मयुरी नलावडे, रोहीणी पांढरकर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!