अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करून खडकी भागात १०,६०,०००/- रु किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला.


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१६/०४/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे खडकी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांना मिळालेल्या बातमी वरून एक इसम नामे बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी, वय २१ वर्षे, रा. जाधववाडी, सीएनजी पंपाजवळ, मोशी, पुणे मुळ गाव राजस्थान हा संशयास्पद रित्या मिळुन आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये १०,६०,०००/-रू. कि.चे ५३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १,८०,०००/- रू. कि.ची महागडी गाडी स्पोर्टस बाईक यामाहा R15 गाडी नं. एम एच १४ एल डी ९८६६ असा अंमली पदार्थ व इतर पैवज असा एकुण १२,९०,०००/- रु.कि.चा जप्त करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, पो.हवा. ५८२२ रोकडे, पो.हवा. ७३४७ शेख, पो. हवा. ७७१२ राक्षे, पो.शि. ८४७५ शेख, पो.शि. ९८४१ पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!