भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! खुन करणा-या अज्ञात आरोपीचा छडा लावुन त्यास ०८ तासमध्ये अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.१३/०१/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा. पुर्वी कात्रज भाजी मंडई पुणे-सातारा रोड, कात्रज पुणे फडून संतोपनगर कडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला फिर्यादी नामे महादेव मनोहर बागल यय-२९ वर्षे धंदा-नोकरी रा. शिवशंभो नंगर गल्ली नं.३/अ कात्रज कोढवा रोड पुणे यांचे वडिल मनोहर बागल यांना कोणीतरी अज्ञात इसमाने दगड किंवा कशाचेतरी सहायाने मारहाण करुन गंभी जखमी करुन जिवे ठार मारले आहे. म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ४५/२०२४ भा.दं. वि.कलम ३०२ अन्वये अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लागलीच मा. वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देवून तपास पथकातील अधिकारी य अंमलदार यांना अज्ञात आरोपीचा शोध घेणेसंदर्भात योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले, त्यानुसार भारती विदयापीठ पोलीस ठाणेकडील तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमे-याव्दारे तसेच गोपीनय वातमीदारामार्फत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा इसम नामे किसन छगन मरगळे वय-२१ रा. साईनगर गल्ली नं.०३ सच्चाईमाता पाण्याचे टाकीजवळ आंबेगाव बु. पुणे याने केला आहे. व सदरचा आरोपी हा तळजाई पठार जंगलामध्ये अंधारात लपून बसला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संपूर्ण तळजाई जंगल परिसरात जावून रात्रीचे अंधारामध्ये आरोपीचा शोध घेत असला असता तो तेथील झाडाझुडपामध्ये लपून बसलेला असल्याचे मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करता त्याने दि.१३/०१/२०२४ रोजी सकाळी दारु पित असताना मवताचा धक्का लागल्याचे कारणावरुन त्यातून झालेल्या वादविवादातून मयतास डोक्यामध्ये दगड मारुन जिवे ठार भारले असल्याचे कबुली दिली त्यावरुन आरोपीस नमूद गुन्हयात अटक केली आहे.
वरीलप्रमाणे भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा ०८ तासाचे आतमध्ये उघडीस आणून कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन परिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश जमदाडे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, महेश चारावकर, निलेश ढमढेरे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, अभिजीत जाधव, राहुल तांबे, मितेश चोरगोले यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

