सिगारेट आणी ईतर तंबाखु उत्पादने कायदया अंतर्गत शतकी कारवाई
प्रमोद बापू सावंत ब्युरो चीफ पुणे ग्रामीण
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांची वेळोवेळी बैठक घेऊन तसेच हजेरीवर मार्गदर्शन करुन त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना वजा मार्गदर्शन करत असतात त्याप्रमाणे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी सन २०२५ मध्ये पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील पान टपऱ्या तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे दुकानदार यांचेवर सिगारेट आणी इतर तंबाखु उत्पादने कायदया अंतर्गत एकुण १०४ कारवाई करुन २,००,०००/- रु. कि. चा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक ०८/१२/२०२५ रोजी मा. राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पान टपरी व्यावसायीक तसेच तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणारे व्यावसायीक यांची बैठक घेऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी संबंधीत विभागाकडुन अधिकृत परवाने घेणे बाबत, शासनाने निर्बंध घातलेल्या तंबाखुजन्य पदार्थाला तसेच ई सिगारेटला बंदी असल्याने त्याची विक्री करू नये याबाबत सुचना देऊन अवैध पदार्थ विक्री करताना आढळुन आल्यास आपणावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची समज दिली आहे. सदर बैठकीस पोलीस स्टेशन हद्दीतील ४३ पान टपरी चालक/मालक हजर होते. बैठकीमध्ये लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), कृष्णा बाबर, अंकुश बोराटे, सहा. पोलीस निरीक्षक, यांनी उनस्थित राहुन मार्गदर्शन केले आहे. रवि आहेर, पोलीस हवालदार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

