पोलिस आयुक्त पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने ‘शाळा सुरक्षा परिषद आयोजनाबाबत ‘ दिनांक २९/०८/२०२४ रोजी पुणे शहरातील विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुणे
महा पोलीस न्यूज! ऑनलाइन पुणे : शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सचिव यांची श्री गणेश कला क्रिडामंच, स्वारगेट पुणे येथे ‘शाळा
सुरक्षा परिषद पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती.
सदर शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमास मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. निखील
पिंगळे यांनी विदयार्थी यांचे सुरक्षेसंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण करून महिला व बालकांचे
सुरक्षतेच्या अनुषंगाने नविन कायदयाची माहिती व त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे
अंतर्गत चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच मा प्रादेशिक परिवहन अधिकारी
श्रीमती अर्चना गायकवाड यांनी रस्ता सुरक्षीततेबाबत सविस्तर माहिती देवून स्कुल बस घोरण
समजावून सांगितले. तदनंतर श्री. संपत सुर्यवंशी संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी वेळोवेळी शासनाने निर्गमीत केलेल्या शासन निर्णय व परिपत्रक यांची
अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार
शर्मा यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समजावून सांगून शाळेमध्ये घडत असलेल्या गैरप्रकारा बाबत
उपाय योजना करणेचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अगिलेश कुमार,
यांनी सुमारे १२०० शाळेचे सुमारे ११ लाख विदयार्थी यांचे पर्यंत सदर परिषदेची माहिती देणेबाबत
उपस्थितांना अहवान केले तसेच विदयार्थी यांचे स्कुलबस / रिक्षा यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी
यांची ने आण न करणेबाबत शाळेच्या १०० यार्ड परिसरामध्ये पानटपरी असता कामा नये, शाळेमध्ये
सीसीटीव्ही बसवून ते सीसीटीव्ही १५ दिवसापर्यंत जतन करावे तसेच शाळेमध्ये कार्यरत सर्व शिक्षक
व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी, वगैरे मागदर्शन करुन शाळेचे
सुरक्षासंबंधी कोणत्याही अडचणीस पुणे पोलीस मदतीसाठी सदैव तत्पर राहिल असे आश्वासन दिले.
तसेच उपस्थितीत मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव यांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नाचे निरसन
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी केले.
शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे १२००
शाळांमधील सुमारे २४०० मुख्याध्यापक, सचिव असे सहभागी झाले होते.


