गंगाई सपाटे शिक्षण संकुलात वार्षिक क्रीडा सप्ताहास सुरुवात.


बालाजी शिंदे ब्युरो चीफ पुणे जिल्हा
महा पोलीस न्यूज ऑनलाईन तारापूर :- येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरुवात झाली.या वार्षिक क्रीडा सप्ताहचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव माने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व क्रीडा साहित्य व विविध खेळाच्या मैदानांचे पूजन करण्यात आले.या क्रीडा सप्ताहात प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असलेले विविध कला,क्रीडा गुण दाखवण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या क्रीडा सप्ताहात खो- खो,थ्रोबॉल,कबड्डी,लंगडी या सांघिक खेळाबरोबर विविध वैयक्तिक मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या इतर सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला,रांगोळी,रंगभरण,पाककला इत्यादी स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे.
 माध्यमिक विभाग इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत तसेच प्राथमिक विभागातील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा निर्विवाद पार पाडण्यासाठी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांची विविध कामे नेमून देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी माध्यमिक विभागात खो-खो व थ्रोबॉल या स्पर्धा पार पडल्या तर प्राथमिक विभागात लंगडी या सांघिक स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या.संपूर्ण दिवस सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभाग घेताना दिसून आले.त्याचबरोबर वर्गशिक्षक म्हणून सर्व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्याबरोबर आनंद साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक विजय संघास भरभरून दाद दिलीच त्याचबरोबर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुध्दा केला. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या खेळाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख विलास डाखोरे यांनी केले तर प्राथमिक विभाग नर्सरी ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या खेळाच्या नियोजनाची जबाबदारी मुख्याध्यापिका सुवर्णा जाधव यांनी पार पाडली.
 यावेळी शरद नागरी सहकारी बँकेचे संचालक प्रदीप दादा निर्मळ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळू काका सपाटे, पोहरगावचे माजी सरपंच सिद्धेश्वर गायकवाड, फुलचिंचोली गावचे सरपंच दादासाहेब प्रक्षाळे,पत्रकार बालाजी शिंदे,प्रगतशील बागायतदार अजिंक्य सपाटे,प्रगतशील बागायतदार दादासाहेब जगताप प्रशालेचे माजी विद्यार्थी चिंतन माने पंढरपूर तालुका शिवसेना अध्यक्ष विलास चव्हाण, लोकमान्य विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रवींद्र पवार, पालक जगन्नाथ प्रक्षाळे, आल्ताब तांबोळी,सुभाष बनसोडे, बिट्टूभाई छापचिडे आदी पालक त्याचबरोबर प्रशालेतील सहशिक्षक सिद्धेश्वर कसबे,मल्लिकार्जुन बामणे,संजय काळे,जमीर शेख, परमेश्वर ननवरे,शिवा भुई,सागर सपाटे,सुजाता जाधव,अस्मिता सोनटक्के,अनिकेत चव्हाण,यांच्यासह प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!