फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी !जबरी चोरी करणारे दोन आरोपीस अवघ्या २४ तासात जेरबंद करुन २,४०,१००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत..
पंकेश जाधव संपादक 7020794626
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/०८/२०२४ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास बुधवार पेठ हनुमान मंदिरामागे फिर्यादी इसम प्रसाद रिचर्ड वॅलेरियन पिन्टो हे सिंगारेट पित थांबले असतांना, अचानक २५ ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे हाताच्या बोटात असणाऱ्या चार सोन्याच्या अंगठ्या, पाकीट व मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेवुन, अॅटो रिक्षामधुन पळुन गेले होते. त्याअनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर, गु.र.नं. १५५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ११५ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयाचा तपास फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री प्रशांत भस्मे सर यांचे आदेशान्वये तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार हे करतील असे आदेश दिल्याने, तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सदर घटनास्थळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तसेच तांत्रीक तपास करुन अवघ्या २४ तासामध्ये रिक्षा नंबर एम.एच.१२-सी.टी.८२४८ वरुन रिक्षाचे मुळमालकाचा शोध घेवुन, त्यानंतर सदरची रिक्षा त्यांनी एका इसमास भाडेतत्वावर दिल्याचे कळताच, यातील संशयीत आरोपी नामे १) फैय्याज मोहम्मद गौस शेख वय २६ वर्षे, रा. स.नं. १३२, पंचधारा सोसायटी, चवथा मजला, फ्लॅट नं. ४०२, दांडेकर पुल, पुणे. २) वैभव उदय धोत्रे, वय ३२ वर्षे रा. मु.पो. अब्दुललाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापुर सध्या रा. स्वारगेट फिरस्ता यांना गुन्हयात अटक करुन, पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीतांकडुन गुन्हयातील २७..०७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, पाकीट तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली अॅटो रिक्षा असा सर्व मिळुन २,४०,१००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करुन, दाखल गुन्हा अवघ्या २४ तासाचे आतमध्ये उघड करण्यात यश आले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परी-३, (अतिरीक्त कार्यभार) संभाजी कदम, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोनि मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागंरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, किशोर शिंदे, नितीन जाधव, गजानन सोनुने, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, म.पो.शि. राऊत यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

