अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये साजरा करण्यात आला व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यातआले
पंकेश जाधव संपादक 7020794626
अमरावती मध्यवर्ती कारागृह,अमरावती
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन अमरावती :- आज दिनांक 01/09/2024 रोजी महाराष्ट्र कारागृह विभागाचा ध्वजदिन अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र कारागृहाच्या ध्वज दिनानिमित्त मा.श्री.प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि मा.श्री.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, मुख्यालय, पुणे यांचे संकल्पनेतून व मा.श्रीमती स्वाती साठे यांचे मार्गदर्शनामध्ये बंदयाकरिता विविध बौध्दीक व मनोरंजानात्मक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी 7.50 वा. राष्ट्रध्वजाचे व कारागृह विभागाच्या ध्वजाचे ध्वजारोहण अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.मनोहर भोसले यांचेकरवी रक्षक संवर्गीय कर्मचारी यांनी परेड संचलन करुन मानवंदना दिली. त्यानंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदयासाठी समता फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या सहकार्याने बुध्दीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, सामान्य ज्ञान परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अधीक्षक श्रीमती किर्ती चिंतामणी यांनी करुन बंदयाचे लॉट तयार करुन त्यानुसार स्पर्धा घेण्यात आली.
Cheif Editor : Pankesh jadhav