२४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून सुमारे ५,८७,०५०/-रु.किं. चे हि-याचे व सोन्याचे दागिने केले हस्तगत


फयाज शेख पुणे प्रतिनिधी 
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे  :- दि.२८/०८/२०२५ रोजी १३/०० वा. चे सुमा. सोपानबाग येथे राहणारे रिटायर्ड विंग कमांडर व त्यांची पत्नी हे लगबगीने घाबरलेल्या अवस्थेत वानवडी पोलीस स्टेशन येथे आले आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक सत्यजीत आदमाने यांना भेटून त्यांचे घरी तब्बल ५,८७,०५०/-रु.कि.च्या सोने व हि-यांचे दागिन्यांची चोरी झाल्याचे सांगीतले.
सदर गुन्हयांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक सत्यजीत आदमाने यांनी वानवडी पोलीस स्टेशन तपासपथक पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांना आदेश देवुन पुर्ण माहीती घेवुन तपास करणेस सांगीतले तसेच रिटायर्ड विंग कमांडर यांची फिर्याद घेवुन त्याबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३४३/२०२५ भा.न्या.सं. क. ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला..
सदर गुन्हयांच्या अनुषंगाने तपासपथक प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार यांनी तपास केला. त्यांनी सदर दांपत्याकडे घरकाम करणा-या दोन महीलांकडे तपास केला असता एका मोलकरणीवर पोलीसांना संशय आला. त्यावरुन तपास करत असताना पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, बी.टी. कवडे रोड येथे राहणारी महीला नामे सुधा चौगुले या अचानकपणे सोनाराकडे दागिने गहाण ठेवण्याकरिता आलेली आहे. पोलीसांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन तिला ताब्यात घेवुन वानवडी पोलीस स्टेशन येथे आणुन तिच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता, तिने दाखल गुन्हा केल्याचे कबुल करुन तिने सदरचे दागिने लपवून ठेवलेल्या ठिकाणावरुन काढुन दिले. सदरचे एकुण ५,८७,०५०/-रुपये किंमतीचे सोन्याचे व हि-यांचे दागिने तिचेकडुन हस्तगत करण्यात आले आहेत. नमुद महीला आरोपी नामे सुधा राजेश चौगुले वय ३५ वर्षे रा. बोराटे वस्ती, बी.टी. कवडे रोड, घोरपडीगांव, पुणे हिस सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलिस उप आयुक्त, परि-५, पुणे शहर डॉ राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. राजकुमार डोके यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंगलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, शैला ठेंगल आणि पुष्पा बोरकर यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!