घरफोडी सारख्या गंभीर गुन्हयात ३ वर्षांपासून फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट ६ कडुन जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा यूनिट ६ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि.१७/०१/२०२४ रोजी, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पो हवा ६७८१ सकटे, पो हवा ७३१७ मुंढे, पो हवा ७८०५ कारखिले यूनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पो हवा ७३१७/ नितीन मुंढे यांना गोपनीय माहीती मिळाली कि, लोणीकाळभोर पो.स्टे. ग.र.नं. ४२६/२०२१ भा.द वि ४५७,३८० अन्वये या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे दत्ता शाम गिरी वय २२ वर्ष रा. बिराजदार हडपसर पुणे हा बिराजदार नगर कॅनॉल लगत असनाऱ्या रोड वर उभा आहे सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दत्ता शाम गिरी असे असल्याचे सांगीतले. नमुद इसम हा पाहिजे आरोपी असल्याचे खात्री करुन त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गन्हे शाखा, युनिट ६ यांचे मार्गदर्शनाखाली गन्हे शाखा, यनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!