मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये महिला बंद्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी फॅमिली हेल्प डेस्क उपक्रम


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक २१.०५.२०२४ रोजी मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये महिला बंद्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी फॅमिली हेल्प डेस्क उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प सन्मा.श्री.योगेश देसाई कारागृह उपमनिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या संकल्पनेतून, आंगन एनजीओच्या सहकार्याने साकारला गेला आहे. याचा उद्देश महिला न्यायाधीन बंद्यांच्या मुलांचे कल्याण आणि महिला बंद्यांना मानसशास्त्रीय सहाय्य देणे आहे. फॅमिली हेल्प डेस्कचे उद्घाटन सन्मा. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी करागृह अधीक्षक विकास रजनलवार, वरिष्ठ तुरूंगाधिकारी आनंद टेंगले आंगनच्या संचालक डॉ. स्मिता धर्ममेर, मानसशास्त्रज्ञ बेहनाज, आणि मुंबई जिल्हा महिला कारागृहाच्या अधिकारी/कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे कारागृहात असलेल्या महिलांना आणि मुलांना मदत करणे हा या मागचा मुख्य हेतु आहे. महिला बंद्यासोबत विविध सत्रे आयोजित करून त्यांच्या मुलांच्या कल्याणासंदर्भातील शैक्षणीक आर्थीक अडचणी समजून घेणे. महिला बंद्यांची मुलाखत, ई-मुलाखत, फोन सुविधा, आणि कायदेविशयक सहाय्य यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या मागचा हेतु आहे.

Advertisement

वरिल बाबीबरोबरच मुलांचे शिक्षण सुरू ठेवणे आणि मुले सुरक्षित वातावरणात राहात असल्याची बंद्यांना खात्री देणे व मुलांना आणि पालकांना जोडून ठेवणे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. सामाजिक संस्थेमार्फत समाजसेवीका तसेच समुदेशकाची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांची माहिती गोळा करणे अडचणी समजून घेणे व कारागृह प्रशासणाच्या सम्मतीने सदरच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न केले जातील. जर संस्थेला बंद्यांच्या अडचणी दूर करण्यात काही अडचण येत असल्यास अधीक्षक यांच्या परवानगीने इतर संस्थांची मदत घेऊन अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबई जिल्हा महिला कारागृहातील फॅमिली हेल्प डेस्क हा एक अग्रगण्य उपक्रम असणार आहे, जो कैदेत असलेल्या महिलांच्या मुलांचे कल्याण सुनिश्चित करण्याचा आणि त्यांच्या मातांना आवश्यक पाठिंबा प्रदान करण्याचा उद्देश असणार आहे. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन केवळ तात्काळ गरजा भागवत नाही तर बंदी आणि मुले यांच्यात येणारा दुरावा कमी करणेसाठी याचा निश्चीतच फायदा होणार आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!