०५ महिन्यापासून बिबवेवाडी पोलीसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर बिबवेवाडी पोलीसांना अमलीपदार्थासह मिळून आला.


प्रमोद बापू सावंत ब्युरो चीफ पुणे ग्रामीण
बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि.१७/०८/२०२५ रोजी इसम नामे अभय रमेश साठे, वय-२३ वर्षे, रा. सिद्धार्थ नगर, सुपर पाण्याची टाकीजवळ, बिबवेवाडी पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्री सोनवणे व त्याचे मित्रांनी काहीएक कारण नसताना फिर्यादी यांचे डोक्यात कोयत्याने मारून फिर्यादी यांना गंभीर दुखापत केल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. २०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(२), १९१(३), ३५२, ३५१ (२), ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून श्रेयश ऊर्फ श्री दिगंबर सोनवणे हा परागंदा झाला होता. त्याचा तपास पथकातील अंमलदार कसून शोध घेत होते.
तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड असे बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, “एक लाल रंगाचा टि शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम हा कुंभारवाडा, बिबवेवाडी पुणे येथे थांबलेला असून तो बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील गुन्ह्यातील पाहीजे आरोपी आहे. तसेच त्याच्याकडे गांजा आहे.” वगैरे मजकुरची बातमी मिळताच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमोल माने यांचे आदेशाने तपास पथकातील अमंलदार विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, सुमित ताकपेरे, रक्षित काळे यांनी मिळालेल्या बातमीनुसार सदर ठिकाणी जावून बातमिप्रमाणे खात्री केली असता वरील वर्णनाच्या इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरी अधिक चौकशी केली असता नमुद इसम रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळालेने सदर रेकॉर्डवरील आरोपीचे नाव श्रेयश दिगंबर सोनवणे, वय- १९ वर्षे, रा. सुपर बिबवेवाडी पुणे असे असल्याचे समजले. तसेच जागीच त्याची अंगझडती व त्याचे ताब्यात असलेल्या गाडीची झडती घेतली असता त्याचेकडे दीड किलो गांजा मिळून आल्याने त्याचेवर बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (C), २० (B) IIA प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असून त्याचेकडून एकुण १५९० ग्रॅम बोंडासह असलेला गांजा एकुण किंमत ३१८००/- रु. चा असा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साो, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त नम्रता देसाई वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे, राहूल खाडे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!