दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी ! चैन-स्नॅचिंग गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस २४ तासात केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक २४/०४/२०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील पोलीस हवालदार ४२११ अजित शिंदे, पोलीस हवालदार ७५५९ रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार ८७७० अमित गद्रे, ८७३२ साईकुमार कारके असे अलंकार पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ६९/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (५) या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्टाफमधील पोलीस अंमलदार ८७७० अमित गद्रे यांनी त्यांचे बातमीदारामार्फत माहिती काढुन मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी इसम नामे यश दत्ता येळेकर, रा. विमाननगर, पुणे. यास ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे इतर २ साथीदार यांचेसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईकरीता अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच सदर आरोपीवर यापुर्वी दोन वेळा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे- १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण काळुखे व पोलीस अंमलदार अमित गद्रे, साईकुमार कारके, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, प्रदीप राठोड, मनिषा पुकाळे, महेश पाटील, इरफान पठाण, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव