गुन्हे शाखा, युनिट-४, पिंपरी-चिंचवड” कडुन अटक घरफोडीचे एकुण-११ गुन्हे उघड व २,९८,०००/- रु. कि. चा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मागील काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातिल हद्दित कमर्शिल ऑफिसचे व दुकानाचे शटर उचकटुन घरफोड्या होण्याचे प्रकार घडत होते. दि. ०६/०४/२०२५ रोजी कोकणे चौक येथिल भुमी अॅलीयम सोसायटीचे कामप्लेक्समध्ये ५ व्या मजल्यावर तीन ऑफिस मध्ये चोरी करुन एकुण ३६,०००/- रु. रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन घेवुन गेल्याने त्याबाबत काळेवाडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-१४३/२०२५ बी.एन.एस कलम ३३१(१),३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल होता. तेव्हा मा. पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे साो, यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेवुन गुन्हे शाखेस सदर प्रकारात लक्ष घालुन तात्काळ आरोपी अटक करुन गुन्हे उघडकीस आणुन प्रतिबंध करणे बाबत आदेशित केले होते.

त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ विशाल हिरे, गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार यांनी वरील गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, पोहवा/मोहम्मद गौस नदाफ, पोशि/गोविंद चव्हाण, पोशि/प्रशांत सैद, पोशि/सुखदेव गावंडे यांचे एक पथक बनवुन त्यांना सी. सी. टी. व्ही फुटेज पाहुन आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर पथकाने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज पाहुन आरोपी ज्या दिशेने गेले त्या मार्गावरील ११ दिवस लागोपाठ ३५० ते ४०० सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहुन दोन आरोपी बाबत माहिती काढली होती. दि. २०/०४/२०२५ रोजी वरील पथक हे वाकड व काळेवाडी पोलीस ठाणे हद्दिमध्ये रात्रगस्त करत असताना जगताप डेअरी चौक, काळेवाडी येथे आले असता वरील गुन्हयातील सी.सी.टी.व्ही फुटेज मधील मिळत्या-जुळत्या वर्णनाचे दोन इसम हे पाठीवर बेंगा घेवुन रस्त्याने पायी चालत जाताना दिसले तेव्हा वरील पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यातील एक इसम हा पळुन जावु लागला तेव्हा वरील पथकातील अंमलदारानी त्यास पाठलाग करुन पकडले. त्यांनतर त्या दोघांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सलीम सिकंदर शेख, वय-५८ वर्षे, रा-फ्लॅट नंबर-सी १०५, अॅरोस अॅक्सोरिया बिल्डींग, सुन्त्री मश्चिद समोर, वांगणी-गोरेगाव, ठाणे अ.क्र २) अजित अर्जुन पिलई, वय-४२ वर्षे, रा-फ्लॅट नंबर-सी१०५, अॅरोस अॅक्सोरिया बिल्डींग, सुन्नी मश्चिद समोर, वांगणी-गोरेगाव, ठाणे असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांचे कडे मिळुन आलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यांचे बॅगेमध्ये घरफोडी करण्याचे साहित्य कटावणी, २ स्क्रू डायव्हर, पक्कड, कटर, लोखंडी पान्हा इत्यादी हत्यारे मिळुन आली. तसेच सदरचे दोन्ही आरोपी हे वरील गुन्हयातील असल्याचे तपात निष्पन्न झाल्याने त्यांना वरील गुन्हयात दि. २०/०४/२०२५ रोजी २३:०० वा अटक करण्यात आली होती.

सदर आरोपींकडे पोलीस कस्टडी दरम्यान सखोल तपास केला असता दोन्ही आरोपी हे घरफोडी करणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन आरोपी नामे सलिम शेख याचे वर मुंबई शहर येथे घरफोडीचे ६२ गुन्हे दाखल असुन त्याचे विरुद्ध मुंबई शहर येथे १० नॉन बेलेबल वॉरंट असुन आरोपी नामे अजित पलई याचे वर २० गुन्हे दाखल आहेत. तसेच सदरचे आरोपी हे वांगणी, जि-ठाणे येथुन बसने चोरी करण्यासाठी येत असत. तसेच आरोपी नामे अजित पलई हा उच्च शिक्षित असुन तो गुगलवर जावुन कमर्शिल ऑफिसेसचे पत्ते शोधत असे त्यानंतर सदर ऑफिसला टारगेट करुन तेथे दोघे येवुन चोरी करुन रोख रक्कम घेवुन जात असे. तसेच ते चोरी करण्यासाठी येताना व जाताना ऑटो रिक्षा किंवा बसचा वापर करत असत. तसेच ते गुन्हा करण्याचे वेळी मोबाईल फोन बंद ठेवत असत. सदर आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी एकुण-११ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांचे कडुन २,९८,०००/- रु. किं चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, गुन्हे शाखा, युनिट ४, पिंपरी चिंचवड हे करत असुन सदर आरोपी हे कोणत्या गुन्हयात पाहिजे असल्यास कायदेशिर प्रक्रिया करुन त्यांचा ताबा घेण्यात यावा.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे साो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, सपोआ, गुन्हे-१ मा. श्री. विशाल हिरे, सपोआ गुन्हे-२ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, सहा.पो.उप.नि. संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे व तांत्रिक विश्लेषणाचे पोहवा/माळी, ननावरे, पोशि/हुलगे, कारके यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!