सिंहगड रोड पोलिस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी ! महीलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करुन एकुण आठ गुन्ह्याची उकल..
पंकेश जाधव संपादक 7020794626
सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, मागील एक ते दिड महिन्यापासुन पुणे शहरामध्ये व पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी होण्याच्या घटना झाल्या होत्या. तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणेचे हददीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अश्याच प्रकाराच्या तीन घटना झाल्याने मा. पोलीस उप आयुक्त साो परि -३ पुणे शहर श्री संभाजी कदम सो, व सहायक पोलीस आयुक्त साो सिंहगड रोड विभाग, श्री आप्पासाहेब शेवाळे, व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, विजय कुंभार, सिंहगड रोड पोलीस ठाणे पुणे यांनी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम व त्याचे पथकास सदरचे दाखल गुन्हे उघड करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या मा. वरिष्ठांचें मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गुप्त बातमीदारामार्फत, तांत्रिक विश्लेषणाव्दारे, सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासुन आरोपीचा शोध घेत असतांना सिंहगड रोड परिसरातील २०० ते २५० सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीचे नाव निष्पन्न करुन नमुद आरोपीचा शोध घेत असतांना, दिनांक २३/०२/२०२४ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, व पोलीस अंमलदार सागर शेडगे, पोलीस अंमलदार राजु बेंगरे, यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, प्रयेजा सिटी रोड, गिरीजा हॉटेलचे बाजुस असणाऱ्या बस स्टॉप जवळ वडगाव पुणे येथे अंदाजे २५ ते ३० वर्षाचा इसम अंगाने मध्यम रंगाने गहुवर्ण, दाढी वाढलेली, ग्रे रंगाची ड्युएट दुचाकी गाडी घेवुन थांबला असुन सदर दुचाकीस नंबर नाही सदर इसम हा थांबलेला असून त्याने २० दिवसापुर्वी आनंदनगर पुणे येथे एका महिलेचे गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेला होता. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली. मा. वरिष्ठांनी सदरच्या बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सहा पोलीस निरीक्षक, सचिन निकम यांनी नमुद स्टाफ सह जावुन बातमीतील ठिकाणाजवळ येवुन थोडे अली कडे थांबुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाचा इसम आहे का ? याबाबत खात्री केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम डयुएट दुचाकी गाडीवर बसलेला दिसला सदर इसमास आमची येण्याची चाहुल न लागु देता त्यास आहे त्या परिस्थीतीत वरील स्टाफचे मदतीने २१/२५ वा. ताब्यात घेवुन त्याचा आम्हांस अधिक संशय आल्याने आम्ही त्यास त्याच्या ताब्यातील असलेली दुचाकीची पाहणी केली असता तीस दोन्ही बाजुने नंबर नसल्याचे दिसुन आले तसेच त्यांच्याकडे बातमीप्रमाणे अधिक तपास करता त्याने २० दिवसापुर्वी आनंदनगर भागात नमुदच्या दुचाकीवरुन येवुन रस्त्याने चालत असलेल्या एक महीलेच्या गाळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन घेवुन गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ७१/२०२४ भा दं वि कलम ३९२ या गुन्ह्यात दि.२३/०२/२०२४ रोजी २२/३० वा अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर केले
असता मा. न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड दिली असता आरोपीकडे पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत अधिक तपास करता त्याने खालील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७१/२०२४ भादवि कलम ३९२
२) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा. रजि. नंबर ९५/२०२४ भादवि कलम ३९२
३) सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा. रजि. नंबर ९७/२०२४ भादवि कलम ३९२
४) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १३३/२०२४ भादवि कलम ३९२
५) अलंकार पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २९/२०२४ भादवि कलम ३९२
६) चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५५/२०२४ भादवि कलम ३९२
७) रावेत पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १७/२०२४ भा.दं. वि. कलम ३९२
८) रावेत पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५६/२०२४ भा.दं. वि. कलम ३९२
वरील एकुण ८ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन दाखल गुन्ह्यातील एकुण ७,६०,००० रु.कि.चे. एकुण १५.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असुन पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील सोा, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.संभाजी कदम सोो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, पुणे शहर, श्री आप्पासाहेब शेवाळे सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. विजय कुंभार साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, अक्षय जाधव, शिरिष गावडे यांचे पथकाने केली.
आरोपीचे नाव व पत्ता
सुमित गोविंद इंगळे वय २८ वर्षे रा. त्रिपाठी अपार्टमेंन्ट, फ्लॅट नंबर १०९, मोरया इंटरप्रायजेस शेजारी मारुजी, हिंजवडी पुणे. मुळगाव श्रीपातपिंपरी, ता बार्शी जिल्हा सोलापुर

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

