मौजमजेकरीता वाहन चोरी करणा-या चोरटयास मुंढवा पोलीसांनी २४ तासात केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

मुंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- तक्रारदार नामे भागिराज शंकरअय्या मुंडलापाटी वय २४ वर्षे धंदा इंव्हेंट मॅनेजमेंट रा. पीसीबी क्वार्टर्स घर नं १२ घोरपडी पोलीस चौकी पाठीमागे घोरपडी पुणे यांनी त्यांचे मालकीची काळ्या ग्रे रंगाची हीरो होंडा मोटार स्प्लेंडर प्लस आरटीओ नं एमएच १२ एमएन ९३२३ गाडी ही त्यांनी मुंढवा हददीतील बीटी कवडे रोडवरील असलेल्या युनिवर्सल फिटनेस क्लब या जीम बाहेर पार्क करुन ठेवलेली होती. सदरचे वाहन हे त्या ठिकाणावरुन अज्ञात इसमाने चोरुन नेले होते. त्याबाबत मुंढवा पोलीस ठाणेस गुर नं ४१/२०२४ भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दिनांक ०२/०२/२०२४ रोजी दाखल झालेला होता. सदर गुन्हयाचे तपासाबाबत मुंढवा पोलीस ठाणेचे वपोनी श्री महेश बोळकोटगी यांनी तपास पथकास आदेश दिलेने मुंढवा तपास पथक सदर वाहनाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पो. शि ८२०८ हेमंत पेरणे यांना त्यांचे गोपनीय बातमिदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीची गाडी घेवुन बीटी कवडे ब्रीज खाली संशयित रीत्या थांबलेला आहे. लागलीच सदरची बातमीवरुन वपोनी श्री मुंढवा पोलीस ठाणे यांनी कारवाईचे आदेश दिलेने तपास पथक अधिकारी श्री सपोनी संदीप जोरे व स्टाफ यांनी सदर वाहनचालकास ताब्यात घेवुन त्याला वापरत असलेल्या गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवुन नंतर सदरची गाडी स्वताच्या फायदयाकरीता चोरल्याचे कबुल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इमरान सिकंदर शेख वय ३४ वर्षे रा भाग्यश्री नगर घोरपडी पुणे असे आहे. आरोपीकडे अधिक तपास सुरु आहे.

Advertisement

सदरची कामगीरी मा.श्री अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री रामनाथ पोकळे साो अति कार्यभार सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा साो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा.श्री आर. राजा साो पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोशि स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!