पुण्यातील कोंढवा परिसरात 14 वर्षाच्या मुलाने चालवला टँकर, टँकरने 2 जणांना उडवलं.
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :-पुण्यातील पोर्शे कार अपघाता नंतर आता आणखी एक भीषण अपघात झाला आहे. एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वेगाने टँकर चालवत अनेकांना उडवले. या अपघातात सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच, एका दुचाकी चालक महिलेला धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. व्यायामासाठी निघालेल्या मुलांना या टँकरने धडक दिली. यात एका दुचाकी चालक महिलेलाही धडक दिली. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्या आहेत. हा टँकर 14 वर्षीय मुलगा चालवत होता, नागरिकांनी टँकरसह अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले आहे.
दुचाकीवरुन महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यवरुन धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरुन उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी टँकरखाली आलेल्या मुलींना बाहेर काढले.
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर अनेक भीषण अपघात झाले आहेत. एका हायवा ट्रकने मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडले. तर कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुले वाहने चालवताना शहरात दिसत आहेत. त्यातच 14 वर्षाच्या मुलाने अवजड टँकर चालवून गंभीर अपघात केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

