धक्कादायक घटना ! भाजप विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या …


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवले आणि अपहरण करून घेऊन गेले होते. यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आज संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बातमीला दुजोरा दिला आहे. सकाळपासून पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम वाघ यांचा शोध घेत होते. खुद्द अमितेश कुमार हे हडपसर पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर बसून होते. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पण दिवसभरात वाघ यांचा काहीच ठिकाणा लागला नाही. संध्याकाळी ग्रामीण पोलिसांना वाघ यांचा मृतदेह आढळून आला. वाघ यांचे अपहरण का करण्यात आले, त्यांची अपहरणकर्त्यांनी हत्या का केली, याचे गुढं वाढले आहे. हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

दरम्यान, सतीश वाघ हे शेतकरी होते. वाघ यांचे अपहरण करताना एका व्हिडीओ समोर आला आहे. एका गाडीत चौघे जण असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. ही गाडी सोलापुरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले होते. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!