मालमत्तेच्या गुन्हयातील बारा लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत”


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले घरफोडी व फसवणूक अशा १० गुन्हयांचा हडपसर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील आरोपींना जेरबंद करुन त्यांचेकडुन हडपसर पोलीस ठाणे कडील एकुण १० गुन्हयामध्ये जप्त करणेत आलेले सोन्याचे दागीने वजन १९९ ग्रॅम ४८० मिली व चांदी वजन ६०० ग्रॅम, रोख ५०,०००/- व इतर साहीत्य असा एकुण किंमत १२,३२,२००/-रु.असे किंमती सोन्या-चांदीचे दागीने मुळ मालकांना मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्वीनी राख, यांचे हस्ते दि.२८/०६/२०२४ रोजी परत करण्यात आला.

Advertisement

सदर कार्यक्रमाचे आयोजन वरीष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे, श्री. संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्रीमती मंगल मोढवे, पोलीस उप निरीक्षक, तपास पथक श्री. महेश कवळे, मुद्देमाल विभागाचे म. पोलीस हवा. एस. एस. म्हांगरे, पोलीस हवा. भोसले, म.पो.ना सुर्यवंशी यांचे प्रयत्नांमुळे फिर्यादी यांना त्यांचे दागीने परत करण्यास मदत झालेली आहे. फिर्यादी यांनी त्यांचे चोरीस गेलेले सोन्याचांदीचे दागीने परत मिळवुन दिले याबद्दल त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत.


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!