पुणे भाजपा आमदार सुनील कांबळे यांची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने निषेध.
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजितभाजपा आमदार सुनील पवार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण निषेधार्थ पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने नरपत गिरी चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.
पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा एक प्रताप समोर आला आहे. काल आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ससून रुग्णालयात घडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काल पुणे दौऱ्यावर होते. काल सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत असताना अजित पवार यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता त्यावेळी भाजपा आमदाराने एक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
शिवाजी सरक असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आमदार सुनील कांबळे यांनी मंचावरून खाली उतरत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. पोलिस कर्मचारी हे सुरक्षा आणि त्यांचे काम बजावत असताना कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला कानशिल लावली या प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यान मध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे.
ससून हॉस्पिटल येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने नरपत गिरी चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात पुणे शहरातील असलेल्या सोमवार पेठ पोलीस लाईन भवानी पेठ पोलीस लाईन शिवाजीनगर पोलीस लाईन खडक पोलीस लाईन स्वारगेट पोलीस लाईन पोलीस लाईन येथील पोलीस पाल्यांनी सहभागी होऊन निषेध नोंदवला तसेच या आंदोलनामध्ये निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग होता.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

