गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगीरी ! स्वारगेट PMT स्टॉपवर मोबाइल चोरी करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन मोबाईल चोरीचा एक गुन्हा केला उघड….
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे शहर आयुक्तालयात दिवसेंदिवस PMT मध्ये घडणाऱ्या चोऱ्या अनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त सो. गुन्हे यांनी अशा घटनांना प्रतिबंध करून गुन्हेगारांवर परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने युनिट २ प्रभारी वपोनि नंदकुमार बिडवई यांनी युनिट २ कडील API वैशाली भोसले मॅडम व स्टाफला गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करून अशा घटनांना प्रतिबंध करण्याचे सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने आज दि. 01/02/24 रोजी सायंकाळी 18.00 वा. सुमारास Unit-2 कडील स्टाफ स्वारगेट ST स्टँड, PMT स्टॉप या गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना HC मोहसीन शेख याना PMT मध्ये चढणाऱ्या प्रवाश्यांचे गर्दीत एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला, त्यास वरील स्टाफने ताब्यात घेऊन चौकशी करता त्याने त्याचे नाव नागेश विष्णू कांबळे वय-37 रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे खिशात 1 SAMSUNG कंपनीचा मोबाईल मिळून आला त्याने तो गर्दीचा फायदा घेऊन एक महिला प्रवाश्याचा बॅगमधून चोरल्याचे समक्ष सांगितले. त्यास 18.30 वा ताब्यात घेतले त्यानंतर मोबाइल मालकाचा शोध घेतला असता फिर्यादी नामे रेवती वाडकर रा मांजरी पुणे यांचेकडे चौकशी करता त्यांनी *स्वारगेट CR No 45/24 IPC 379 प्रमाणे स्वारगेट पो स्टे येथे ₹ 15,000 रु किमातीचे मोबाइल चोरीबाबत तक्रार दिल्याचे समक्ष सांगितल्याने आरोपी नागेश विष्णू कांबळे वय-37 रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी पुणे यास वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही करीत स्वारगेट पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपीच्या गुन्ह्याचा पूर्व इतिहास :- आरोपी नागेश विष्णू कांबळे यांचेवर यापूर्वी चोरीचे 02, स्त्री अत्याचार – 01, जुगार – 02 असे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ठ झाले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री.अमोल झेंडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, पो.अंमलदार शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, विजय पवार, संजय जाधव, साधना ताम्हाणे, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, मोहसीन शेख या पथकाने केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

