शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी ! पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगार अग्नीशास्त्रासह अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील सपोनि वैशाली भोसले, सपोफौ नामदेव रेणुसे, पो. अंमलदार शंकर नेवसे , संजय जाधव,साधना ताम्हाणे, विजयकुमार पवार, पुष्पेन्द्र चव्हाण असे युनिट २ च्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना सपोफौ नामदेव रेणुसे व पोना विजयकुमार पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजीनगर गावठाण येथे रोकडोबा मंदिराजवळ एक अनोळखी इसम काळे व पांढऱ्या पट्ट्याचे टी-शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला फिरत असून त्याच्या कंबरेला अग्निशस्त्र आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच युनिट २ चे प्रभारी वपोनि.श्री नंदकुमार बिडवई यांना कळविले असता ,त्यांनी सदर बाबत योग्य ते मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले . लागलीच युनिट २ चा स्टाफ मिळाले बातमीच्या ठिकाणी गुप्तपणे पाहणी करीत असताना ,सदर ठिकाणी बातमीतील अशयाप्रमाणे इसम थांबलेला दिसला असता, त्यास दि.०१/०२/२०२४ रोजी १६/२० वा. ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव अमोल गजानन बोदडे वय ३५ वर्ष रा. ७४३ शिवाजीनगर गावठाण पुणे असल्याचे सांगितले ,त्याची सोबत असलेल्या पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेच्या उजव्या बाजूस खोचलेले एक अग्निशास्त्र व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास अग्नीशास्त्राबाबत परवाना असले बाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास पंचासमक्ष जागीच पंचनामा करून, एक पिस्टल मॅगझिन सह व एक जिवंत काडतूस असे एकूण ५०,४००/- रु. किं. असलेले मुद्देमाल ताब्यात घेऊन युनिट ०२ कार्यालय येथे आणून त्यास अटक करून वैद्यकीय तपासणी करून, पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सर ,मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर, मा .पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर , मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. सुनील तांबे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली भोसले,सहापोफौ नामदेव रेणुसे,पो. अंमलदार संजय जाधव,शंकर नवसे , मोहसीन शेख, अमोल सरडे , साधना ताम्हाणे,विजयकुमार पवार, पुष्पेन्द्र चव्हाण या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!