फरासखाना पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! दोन अल्पवयीन मुलीचा ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचे आधारे शोधुन काढण्यात पोलीसांना यश
जोसेफ नडेसन पुणे प्रतिनिधी
फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) हा गुन्हा दि.०७/१०/२०२५ रोजी नोंद झाला. त्यामध्ये स्वाधार अनाथालय बुधवार पेठ पुणे येथे राहणाऱ्या १३ वर्षे वयोगटातील राजमाता जिजाऊ विद्यायलय, कसबा पेठ, पुणे येथील ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली सदर शाळेतून अपह्त झाल्याची तक्रार दाखल होती.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य) श्री उत्तम नामवाडे, यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी सपोनि वैभव गायकवाड व पोलीस उप-निरिक्षक अरविंद शिंदे तसेच पोलीस अंमलदार यांना घटनेची गांभिर्य लक्षात घेवुन महत्त्वाच्या सुचना देवुन वेग-वेगळी २ पथके तयार करुन, त्यांना कामाची विभागणी करुन दिली. त्याप्रमाणे तपासकामी नेमण्यात आलेल्या पथके यांनी एकमेकांचे संपर्कात राहुन, वर नमुद गुन्हयातील अपहत झालेल्या दोन अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने शोध सुरु केला, सदर अल्पवयीन मुली या अनाथ असल्याने व त्यांचे कोणीही नातेवाईक अथवा ओळखीचे इसम उपलब्ध नसल्याने सदर अल्पवयीन मुली शोधण्यात खूप अडचणी आल्या होत्या. परंतु तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड व चेतन होळकर यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने कसबा पेठ, पवळे चौक कुंभारवेस चौक, शिवाजीनगर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहाय्याने शोध घेता त्यांतील एक अल्पवयीन मुलगी एकटीच वाकडेवाडी शिवाजीनगर येथे त्याच दिवशी रात्री मिळून आली. परंतु दुसरी अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही.
सदर मिळालेल्या अल्पवयीन मुलीकडून दुसऱ्या अल्पवयीन मुलीबाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे तपास पथकाने परत दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही च्या आधारे शोध सुरू केला. दिनांक ०८/१०/२०२५ पासून शिवाजीनगर, पाटील इस्टेट, संगमवाडी, बॉम्बे सॅपर चौक, विश्रांतवाडी, मॅगझीन चौक, दिघी, आळंदी, मोशी व भोसरी या परिसरातील दिनांक ११/१०/२०२५ रोजी पर्यंत सलग चार दिवस रात्रंदिवस ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही च्या आधारे शोध घेतला असता तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर व प्रशांत पालांडे यांचे पथकास सदर अल्पवयीन मुलगी मोशी परिसरात तुपे वस्ती, गणेश नगर येथे दिसून आल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ रात्री ०९.०० वा. तेथे जाऊन सदर परिसरात शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी तेथील रस्त्याचे कडेला बसलेली मिळून आल्याने तिला सुस्थितीत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-१, श्री. कृषिकेश रावले, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. विवेक मासाळ, (अति.कार्य.) मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य) उत्तम नामवाडे, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, संतोष गोरे, सपोफौ मेहबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर, पोलीस अमंलदार, प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड, चेतन होळकर, विशाल शिंदे, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, मनिषा पुकाळे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव