भाजप मित्र पक्ष महायुती सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन…
राजशेखर जाधव पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे – दिनांक २४ आॕक्टोबर , ४०५ मंगळवार पेठ, मालधक्का चौक, पुणे ११ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनला लागुन असलेली सन २००० सालापासून आरक्षित स्मारकाची जागा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व मे. एन.जी. व्हेंचर या खाजगी बांधकाम व्यवसायिकामध्ये ६० वर्षाचा भाडेकरार करुन जवेळपास ५५० कोटी रुपयाची जागा फक्त ६९ कोटी मध्ये कराराने देवून फार मोठा भ्रष्टाचार महायुती सरकारने केलेला आहे. या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हाचे पालक मंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून समितीच्या वतीने निवेदन दिलेले आहेत तसेच ईमेल व्दारेही निवेदने पाठविलेली आहेत. परंतु दिनांक १५ ऑगस्ट २०२५ च्या आंदोलनामध्ये पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हजारो लोकांच्या समक्ष मोबाईल स्पिकर व्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप आंदोलकांना जाहीरपणे सांगितला की, आंदोलन हे थांबवा अशी विनंती करतो. ४०५ मंगळवारपेठ, मालधक्का चौक, पुणे ११ ही जागा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी दिली असे जाहीर करतो. आणि येत्या ८ दिवसामध्ये मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत जागा हस्तांतरणाचा आदेश काढण्यात येईल अशाप्रकारे जाहीर करुन आज जवळ जवळ अडीच महिने झाले. अद्यापही या जागे संदर्भात महायुती सरकारने कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश काढलेले नाहीत किंवा एन.जी. व्हेंचर आणि एमएसआरडीसी यांच्यामध्ये झालेला करार रद्द करण्याची कोणतीही कारवाई किंवा लेखी आदेश झालेले नाही. या मुळे पुणे शहरातील संविधानवादी, लोकशाहीवादी, आंबेडकरवादी नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झालेली आहे. म्हणून सविधानवादी नागरिकांच्या वतिने गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानसमोर, पुणे स्टेशन, पुणे येथे बेमुदत जन आक्रोश आंदोलन सुरु करणार आहेत. हे आंदोलनाचे मुख्य समन्वयक व नेतृत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये अनेक समविचारी पक्ष, संघटना, संस्था, बुध्द विहारांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे जनआक्रोश आंदोलन भाजपा मित्र पक्ष महायुती सरकार सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची जागा हस्तांतरण करत नाही तसेच झालेला भाडेकरार रद्द करत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरुच राहील असे आज पत्रकार भवन पुणे येथे परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, दिपक गायकवाड, निताताई आडसुळे, फिरोज मुल्ला, रविंद्र कांबळे, किरण जाधव,निखिल दुर्गाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

