लोणीकंद पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी ३५ लाखांचा अपहार झालेला माल नंदुरबार येथुन हस्तगत करुन आरोपीस केली अटक


पंकेश जाधव मुख्य संपादक ७०२०७९४६२६
लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर 
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २५/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०७/०० वा. चे सुमारास रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे येथील मा भगवती ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटनेर ट्रक नंबर MH-12-TV-1024 यामध्ये कटकेवाडी येथील मारुती वेअर हाऊस येथुन हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज लोड करुन सदरचे फ्रिज शिल्पा इलेक्टॉनिक्स, राजकोट, गुजरात येथे पोहच करण्यासाठी नमुद कंटनेर ट्रकवरील ड्रायव्हर घेवुन गेला होता, परंतु दिनांक २७/०९/२०२५ रोजी शिल्पा इलेक्टॉनिक्स, राजकोट, गुजरात येथे कंटेनर ट्रक पोहचला नसल्याने तसेच कंटेनर ट्रक वरील ड्रायव्हरचा फोन बंद लागत असल्याने व कंटेनर ट्रकचे जीपीएस लोकेशन सुरत, गुजरात येथे एकाच ठिकाणी दाखवित असल्याने मा भगवती ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर प्रशांत कोंडे यांनी नमुद जीपीएस लोकेशनवर कंटेनर दुसरा कंटेनर ट्रक ड्रायव्हरला पाठविले असता नमुद ठिकाणी कंटेनर ट्रक मिळुन आला नाही. त्यावेळी मॅनेजर प्रशांत कोडे यांना कंटनेर ट्रक ड्रायव्हरने कंटेनर ट्रक व त्यामधील मालाचा अपहार केल्याची खात्री पटल्याने त्यांनी नमूद कंटेनर ट्रक व त्यामधील हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज असा एकुण ३५,७९,६६०/- रुपये किंमतीचे मालाचा अपहार केलेबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
मा. श्री. सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकाचे अधिकारी अर्जुन बेदगुडे, पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे स्टाफला नमुद गुन्हा उघडकीस आणुन अपहार झालेला माल हस्तगत करणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोउपनि अर्जुन बेदगुडे व त्यांचा स्टाफ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कंटनेर ट्रकवरील ड्रायव्हरचा शोध घेत असताना अपहार झालेला कंटनेर ट्रक हा नंदुरबार येथील आर. के. पेट्रोलियम येथे असलेबाबत तक्रारदार प्रशांत कोंडे यांचेकडुन माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांचे आदेशाने पोउपनि अर्जुन बेदगुडे व त्यांचा पोलीस स्टाफ तपासकामी नंदुरबार येथे गेले असता आर के पेट्रोलियम येथे कंटनेर ट्रक नंबर MH-12-TV-1024 हा बेवारस अवस्थेत मिळून आल्याने सदरचा कंटेनर ट्रक ताब्यात घेवुन जप्त केला. तसेच नमुद कंटेनर ट्रक ड्रायव्हर व त्यामधील अपहार झालेल्या मालाबाबत पोउपनि अर्जुन बेंदगुडे व त्यांचा स्टाफ यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन गोपनीय बातमीदाराचे मार्फतीने माहिती प्राप्त करुन कंटेनर ट्रक डायव्हरचा साथीदार आरोपी निसार अहमद इसाक खान, वय ३५ वर्ष, रा. शास्त्री मार्केट, मंगल बाजार नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याचेकडुन अपहार झालेले हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज एका खेडे गावातील घरातुन ताब्यात घेवुन एकुण ३५,७९,६६०/- रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. तसेच नमुद आरोपीस अटक करुन त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आली असुन पुढील अधिक तपास पोउपनि अर्जुन बेदगुडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे सतो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे साो, सहाय्यक पोलीस आयुक्त सखो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सर्जेराव कुंभार सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे पोउपनि अर्जुन बेंदगुडे, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, किरण पलांडे, अमोल ढोणे, सुधीर शिवले, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!