विधी संघर्ष बालकास ताब्यात घेत चोरीची एकूण 07 वाहने किमती 2 लक्ष 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त……एकूण 7 वाहन चोरीचे गुन्हे उघड-
पंकेश जाधव संपादक 7020794626
*दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक- 1 गुन्हे शाखेची कामगिरी
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.न. 219/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना *पो. शि./8732 साईकुमार कारके व पो. हवा. 288 धनंजय ताजणे* यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील संशयित *विधीसंघर्ष ग्रस्त बालक* हा शनिवार पेठ, पुणे येथे चोरलेल्या रिक्षासह् थांबला आहे… सदर बातमीच्या अनुषंगाने इकडील पथकाकडील अधिकारी सपोनि प्रविण काळुखे व स्टाफ असे वर्णन मिळालेल्या ठिकाणी गेले असता तो चोरलेल्या रिक्षा सह थांबलेला विधी संघर्ष बालक हा मिळून आला. त्याच्या नातेवाईकांना बोलवून त्यांच्या समक्ष त्याने केलेल्या इतर वाहन चोऱ्यांबद्दल अधिक चौकशी विचारपूस केली असता त्याने पुढील प्रमाणे वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
1) *वारजे पोलीस स्टेशन* गुरन 335/2024* *भा.न्या.सं. 303(2)*
2) *वारजे पोलीस स्टेशन* गुरन 336/2024 भा.न्या.सं.303(2)*
३) *वारजे पोलीस स्टेशन* गुरन 337/2024 भा.न्या.सं.303(2)*
4) *विश्रामबाग पोलीस स्टेशन*गुरन 219/2024 भा.न्या.सं.303(2)*
5) *अलंकार पोलीस स्टेशन*गुरन 120/2024 भा.न्या.सं.303(2)*
6) *राजगड पोलीस स्टेशन*गुरन 405/2024 भा.न्या.सं.303(2)*
7) पौड पोलीस स्टेशन*गुरन 346/2024 भा.न्या.सं.303(2)*
अशी **एकुण 07 वाहनचोरीचे गुन्हे त्यामध्ये 01 चारचाकी वाहन ,03 तीन चाकी ऑटो रिक्षा व 03 मोटार सायकली** असे गुन्हे उघडकीस आणले असून **एकूण किंमती 2,50,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे*
सदरचा बालक हा विधी संघर्ष ग्रस्त असल्याने त्यास त्याचे पालकांचे ताब्यात देऊन गुन्हे दाखल असलेल्या पोलीस स्टेशन येथे पालकांसोबत हजर राहणेबाबत समजपत्र देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1, पुणे शहर* यांचे मार्गदर्शनाखाली *दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक 1, गुन्हे शाखा, पुणे* शहर कडील *पोलीस निरीक्षक, श्री नंदकुमार बिडवई यांचे सूचने प्रमाणे सपोनि प्रवीण काळूखे, पो.हवा गणेश ढगे, पो.हवा बाळू गायकवाड, पो.हवा धनंजय ताजने, पो. ना. रवींद्र लोखंडे, पो.शि महेश पाटील, पो.शि साई कुमार कारके, म.पो.हवा वारे, पोशि. बनकर यांनी केली आहे*

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

