दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्याल येथे ध्वजारोहण समारंभ संपन्न
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजारोहण समारंभ दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे मा.डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), महाराष्ट्र राज्य पुणे यांचे हस्ते करण्यात आला १५ ऑगस्ट २०२४ करिताचे मा. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक श्री. नितीन भालचंद्र वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे यांना घोषीत झाले. त्यावेळी मा. महोदयांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेतर्फे पदक विजेते अधिकारी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा. डॉ. सुपेकर साो यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यावेळी श्री. नितीन वायचळ,
प्राचार्य यांच्यासह मुख्यालय व प्रशिक्षण महाविद्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

