गुन्हे शाखा युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी ! घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि. ३०/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ हद्दीमध्ये आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने मा. वरिष्ठांचे आदेशाने पाहिजे आरोपी यांचा शोध घेणेकामी युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे सुहास तांबेकर असे पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक नितीन मुंढे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार पापासिंग दयालसिंग दुधानी हा बी टी कवडे रोड, वानवडी, पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणावरून नमुद आरोपी नामे पापासिंग दयालसिंग दुधानी, वय ५० वर्षे, रा. पेरणे, बिराजदार नगर, गल्ली नं.५. हडपसर, पुणे यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी केली असता हडपसर पो.स्टे. कडील तीन घरफोडीच्या गुन्हयांत सहभाग निश्चित झाल्याने त्यास पुढील तपासकामी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे. तसेच त्याचे पुर्व गुन्हे अभिलेख तपासता नमूद आरोपीवर १०० पेक्षा जास्त घरफोडी, वाहन चोरी, दरोडा, पोलीसांवर हल्ले, शरीराविरुद्धचे गुन्हे व इतर गुन्हे दाखल असून सदरचा आरोपी हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सागली येथील एकुण १२ गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे. तसेच सदर आरोपीवर यापुर्वी मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली असून त्यामधुन तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, समीर पिलाने, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!