बावधन पो.स्टे. तपास पथकाने ०३ पिस्टल, ०५ जिवंत काडतुस, ०६ कोयते व ०१ गुप्तीसह ०५ आरोपी घेतले ताब्यात.


सागर कसबे पुणे प्रतिनिधी

बावघन पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १३/०१/२०२५ रोजी मा. पोलीस आयुक्त साो यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैदय शस्त्र धारकांवर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केल्याने पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ व सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांचे सुचने प्रमाणे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन व तपास पथकाचे अधिकारी व स्टाफ असे पो.स्टे. हद्दीतील अवैदय शस्त्र धारकांवर कार्यवाही करणेकरीता बावधन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोहवा /१५७६ अरुण नरळे यांना मिळालेल्या बातमी वरुन पो.स्टे. हद्दीत एक काळया रंगाची व काळे काचा असलेली क्रेटा गाडी नं. एम.एच.१२- टी.एन.६९९९ हि गाडी पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यातील १) सुमीत संजय करेकर, रा. तळजाई वस्ती, तळजाई मंदिराजवळ, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे, यांचे ताब्यातुन ०१ देशी पिस्टल व ०२ जिवंत राऊंड असे जप्त केले. तसेच सदर कारची झडती घेतली असता त्या कारच्या डिक्कीमधील स्टेपणी ट्रे खाली स्टेपणी जवळ ०४ लोखंडी कोयते व ०१ गुप्ती असे जप्त करुन त्याचे विरुध्द् बावधन पो.स्टे. गुरन १७/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), ४(२५) म.पो.अधि.३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

तसेच तपास पथकाचे पोहवा/८६० फारुक मुल्ला यांना मिळालेल्या बातमीवरुन सुसगांवात महादेवनगर परीसरात इसम नामे २) हरी महादेव पवार रा. महादेवनगर, सुसगांव पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन ०१ देशी पिस्टल व ०२ जिवंत राऊंड जप्त केले व त्याचे विरुध्द बावधन पो.स्टे. गुरन १६/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), म.पो.अधि. ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

वरील दोन्ही गुन्हयाचे तपासात दोन्ही पिस्टल बावधन पो.स्टे. रेकॉर्ड वरील आरोपी नामे आदेश टेमकर रा. सुसगांव पुणे याचेकडुन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
वरील आरोपी सुमीत संजय करेकर याचे तडीपार साथिदार गणेश ऊर्फ गुड्या अनिल पाटेकर, वय २३ वर्ष, रा. डी/७०४, स्नेहविहार सोसायटी, दाटंग पाटील नगर, शिवणे, पुणे व ओंकार ऊर्फ चिक्या राजु जगताप वय १७ वर्ष रा. मामासाहेब मोहोळ शाळेमागे, विठठलवाडी माळवाडी पुणे यांना ०२ लोखंडी कोयत्यासह दहशत माजवतांना मिळुनआल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द् बावधन पो.स्टे. गुरन १८/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ४(२५), म.पो.अधि.३७ (१) (३) १३५,१४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
तसेच दि.०९/०१/२०२५ रोजी बंटारा भवण, महाळुंगे पुणे येथे तपास पथकासह पोना/महात व पोशि/बंडगर यांनी नाईट राउंड दरम्याण एक काळया काचा असलेली कारमधुन इसम नामे केशव त्र्यंबक काळे रा. भोजेवाडी ता. आष्टी जि. बीड याचे ताब्यातुन ०१ पिस्टल, ०१ काडतुस व गांजा जप्त करुन याचे वर बावधन पोस्टे. गुरन १२/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), म.पो.अधि.३७ (१) (३)१३५ व एनडीपीएस कलम ८ (क) २० (ब) ii (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. शशीकांत महावरकर सोो. सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी सो. अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सुनिल कुराडे सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिं.चिं. यांचे मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाणेचे श्री. अनिल विभुते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भास्कर कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे प्रमुख प्रशांत महाले, सहायक पोलीस निरीक्षक, बंडू मारणे, श्रेणी पो.उप.नि, पोलीस अंमलदार बापुसाहेब धुमाळ, फारुक मुल्ला, संजीव सावंत, विक्रम कुदळ, मनोज राठोड, अरूण नरळे, विक्रांत चव्हाण, तौसीफ महात, दत्ता शिंदे, स्वप्नील साबळे, संतोष बंडगर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!