राजू राजभरच्या न्यायासाठी रिक्षा पंचायत संघटनेचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयावर मोर्चा.


डॅनियल अँथोनी पिंपरी चिंचवड ब्युरो चीफ

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी ता.१५,सावकारी जाचामुळे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालक राजू राजभरला न्याय मिळवून देण्यासाठी रिक्षा पंचायत संघटना आक्रमक झाली आहे.संघटना अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली १७जानेवारीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे ,तसेच संघटनेच्या वतीने शहरात नियमबाह्य वसुली करणारे सावकार व फायनान्स कंपन्या यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटल्याप्रमाणे खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून राजू राजभर या तरुण रिक्षाचालकाने ३जानेवारी २०२५रोजी चिंचवड येथे आत्महत्या केली ते चिंचवड रेल्वे स्टेशन येथील साईबाबा वसाहतीत राहत होते .राजभर यांच्या आर्थिक परिस्थिती अतिशय गरीब असून,घरातील ते एकमेव कमावते व्यक्ती होते त्यांच्या जाण्याने महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकणारा मुलगा शालेय शिक्षण घेणारी मुलगी पत्नी व विकलांग आई असे कुटुंब उघडे पडले आहेत .जिवंत असताना सदरक्षणाय ब्रीदवाक्य मिळवणाऱ्या पोलिसांचे संरक्षण राजभर यांना लाभले नाही आणि आत्महत्या केल्यानंतर राजभर यांना न्याय मिळू शकलानाही.

राजू राजभर यांनी मृत्यूपूर्वी आपल्यावर घेतलेल्या कर्जफेडीचाकसा दबाव आणला जात होता ,आपल्याला व मुलीला मारून टाकण्याचे उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या पैसे देऊनही व्याज मागण्याच्या बहानाने कसे छळले जात होते ,याबद्दल लेखी पत्र लिहिले आहे आणि तसा व्हिडिओ ही आत्महत्या करण्यापूर्वी तयार केला आहे इतका ठोस पुरावा असतानाही राजभर यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपी पैकी दोन आरोपी जमिनीवर सुटले आहेत इतर फरार दोन आरोपींना देखील जामीन मंजूर झालेला आहे ही खरंच धक्कादायक बाब आहे.

या प्रकरणात पोलीस प्रशासनाचे हलगर्जी व संशयापद भूमिका विरुद्ध राजभर प्रकरणी पोलिसांनी न्यायोचितकारवाई करावी तसेच फायनान्स कंपन्या व सावकार यांना आवर घालावा याविषयीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव रिक्षा पंचायत चे सरचिटणीस नितीन पवार मार्गदर्शक मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ता.१७रोजी सकाळी दहा वाजता रिक्षासह मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

रिक्षा पंचायतीच्या पिंपरी चिंचवड परिसरातील सभासद रिक्षा चालकांची याविषयी नुकतीच सभा झाली.त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे .अध्यक्षस्थानी नितीन पवार होते राजभर यांची आत्महत्या ही एकमेव व सुट्टी घटना नाही आर्थिक धोरणामुळे आपल्या आवश्यक गरजांसाठी गरिबांना बँकांकडून न मिळणारे कर्ज जुन्या पठाण सावकारी व्यवस्थित सारखे उदयाला झालेल्या नॉन बँकिंग ,फायनान्स कंपन्या ,बेकायदा सावकारी आणि नाईलाजाने या कंपन्याकडून सावकाराकडून घ्यावे लागणारे कर्ज ते वसूल करण्यासाठी वसुली एजंट करून कर्जदारांना होत असलेली शिवीगाळ,मारहाण ,नियमबाह्य पद्धतीने रिक्षा /वस्तू जबरदस्तीने ताब्यात घेणे ,याविरुद्ध प्रशासन, पोलीसाकडे तक्रार द्यायला पीडित कर्जावर गेले असता न मिळाला आधार ,उलट त्यांचीच होणारी उलट तपासणी प्रसंगी कारवाई .यामुळे वसुली एजंटाची भीड चेपत गेले आहे .कर्जदारांची असाहयता वाढत जात आहे .त्यातूनच राजवर यांच्या आत्महत्या सारख्या घटना घडतात .या पातळीवर प्रकरण येण्याआधी पोलिसाकडे दाद मागितले असता ती मिळत नाही उलट तक्रारदाराला जाब विचारला जातो अशी कैफियत सभेला उपस्थित रिक्षा चालकांनी मांडली. मोर्चाची सुरुवात पिंपरीतील डॉक्.बाबासाहेब आंबेडकर चौकातून ,डॉ.आंबेडकर पुतळ्याला हार घालून करण्यात येईल .नंतर पिंपरी चौक ,अहिल्यादेवी होळकर चौक ,महावीर चौक ,खंडोबा माळ चौकातून डावीकडे वळून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे मोर्चा जाणार आहे या मोर्चामध्ये राजभर यांचे कुटुंबातील सदस्य देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटना सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!