जबरी चोरी मोक्याच्या गुन्ह्यातील 06 महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा, युनिट-4 चे ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट-4 चे पथक युनिट 04 हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस हवालदार विनोद महाजन व पोलीस नाईक नागेश सिंह कुवर यांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 545/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(4),3(5) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी 1999 चे कायदा कलम 3(1) (ii) 3 (2) 3 (4) या दाखल गुन्ह्यात 06 महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपी नामे अक्षय सुरेश गायकवाड राहणार जय शक्ती मित्र मंडळ जवळ लक्ष्मी नगर येरवडा पुणे. हा आंबेडकर पुतळा डीपी रोड औंध येथे थांबला असल्याची अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिटच्या 4 पथकाने बातमीप्रमाणे खात्री करून त्यास ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून मा . सहाय्यक पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

