पिस्टल, काडतुसे बाळगणा-या विधीसंघर्षीत बालकास शिताफीने केले जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१६/०३/२०२५ रोजी एक विधीसंघर्षीत बालक वय १७ वर्षे हा दारुवालापुल चौकाजवळील नागझरी नाल्याजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असुन त्यांचेकडे पिस्टलसारखे हत्यार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली असता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, व स्टाफ यांनी दारुवाला पुल चौकाजवळ नागझरीनाला येथे सापळा लावला होता.

त्यानुसार रात्रौ टिळक आयुवैदीक विद्यालयाचे पाठीमागील बाजुस नागझरी नाल्याजवळ आडोशाला संशयीत विधीसंघर्षीत बालक थांबल्याचे दिसल्यावरुन त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांने नाव सांगुन त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५०,०००/- रु. किं. चा एक सिल्वर रंगाचा मॅग्झीन असलेला गावठी कट्टा व १०००/- रु.किं. चे दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने सदर विधीसंघर्षीत बालकाविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५१/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास करीत आहोत.

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.१. श्री. संदीपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, रहीम शेख, अमोल गावडे, शिवा कांबळे, कल्याण बोराडे, भाग्येश यादव यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!